Narendra Modi Vs Rahul Gandhi : ‘एवढे दिशाहीन विरोधक मी कधीच पाहिले नाहीत’, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य करताना केले. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले , पंतप्रधान मोदी तुम्हाला हवे ते म्हणू शकतात, आम्ही भारत आहोत आणि आम्ही मणिपूरच्या लोकांना मदत करत राहू.
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी आघाडीवरील ‘इंडिया’च्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. मंगळवार, 25 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीबद्दल बोलताना टीका केली. ते म्हणाले की, “एवढा दिशाहीन विरोध मी कधीच पाहिला नाही.”
पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर काही वेळातच काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विट केले.
राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी, तुम्हाला हवे ते बोला. आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरच्या जखमा भरण्यासाठी मदत करत राहू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसण्यासही मदत करू. आम्ही राज्यातील सर्व जनतेसाठी प्रेम आणि शांतता परत आणू आणि मणिपूरमध्ये भारताचे विचार पुन्हा रुजवू.”
राहुल गांधींसोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यावर हल्लाबोल केला. खरगे म्हणाले, “आज मणिपूर जळत आहे, तिथे बलात्कार होत आहेत. आपण मणिपूरबद्दल बोलत आहोत, पण इथे पंतप्रधान ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोलत आहेत.”
Manipur : ‘जिवंत राहायचं असेल, तर कपडे काढ’, ‘त्या’ पीडितेने सगळंच सांगितलं
राज्यसभेत बोलताना खर्गे म्हणाले, “चार दिवसांपासून अनेक लोकप्रतिनिधी संसदेत 267 अन्वये नोटीस देत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही. भाजप सरकारच्या काळात 267 अन्वये या सभागृहात चर्चा झाली आहे. काँग्रेसचे सरकार असतानाही 267 अन्वये चर्चा झाली आहे.”
असा दिशाहीन विरोध कधीच पाहिला नाही
25 जुलै रोजी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात पंतप्रधान म्हणाले की, असा ‘दिशाहीन विरोध’ कधीच पाहिला नव्हता. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींच्याच विधानाचा हवाला देत याला उत्तर दिले आहे.
“ते भारत या नावाची स्तुती करत असतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ईस्ट इंडिया कंपनी. इंडियन मुजाहिद्दीन. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया – हे देखील INDIA आहे. फक्त INDIA वापरण्यात अर्थ नाही.”
Manipur : आमदाराला शॉक, स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळले; तरीही…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर लैंगिक हिंसाचाराच्या व्हिडिओवरून गदारोळ सुरू आहे. मंगळवारी राज्यसभेत बोलताना भाजप नेते पियुष गोयल म्हणाले की, कोणत्याही मुलीसोबत आणि महिलेसोबत गैरवर्तन होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजस्थान असो, छत्तीसगड असो, तेलंगणा असो वा पश्चिम बंगाल असो, हे तितकेच दुर्दैवी आहे. ते पुढे म्हणाले की, मणिपूरसह या सर्व राज्यांवर चर्चा झाली पाहिजे, तेथे दूध का दूध और पानी का पानी होईल.
ADVERTISEMENT