महाराष्ट्रात शाळा पुन्हा कधी सुरू होणार? राजेश टोपे यांनी दिलं उत्तर, म्हणाले….

मुंबई तक

• 10:20 AM • 16 Jan 2022

कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरिएंट्सचे रूग्ण वाढू लागले. त्यामुळे राज्यातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद करण्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोधही दर्शवला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले आहेत राजेश टोपे? ‘शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरिएंट्सचे रूग्ण वाढू लागले. त्यामुळे राज्यातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद करण्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोधही दर्शवला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

‘शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.’

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाच जानेवारीपासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर रात्रीच्या निर्बंधाबाबत सरकारने जो निर्णय घेतला त्यामध्ये जे नियम केले होते त्यातही शाळा 15 फेबुवारीपर्यंत शाळा बंद राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता 15 फेब्रुवारीनंतर तरी शाळा सुरू होतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नागपूर: लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरपंचांकडूनच मारहाण, Video व्हायरल

लसीकरणाच्या सुरुवातील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं टोपे म्हणाले. जे लोकं डोस घेत नाहीत त्यांची जनजागृती करुन त्यांनाही डोस दिला जाईल. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस आतापर्यंत दिली आहे, असं देखील टोपे यांनी सांगितलं.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, भाचीने सांगितलं कशी आहे प्रकृती?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची आणि त्यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांच्या भाचीनेच दिली होती. अजूनही त्या रूग्णालयातच आहेत. त्याना लवकर बरं वाटावं म्हणून मंगेशकर कुटुंबीयांसह सगळा महाराष्ट्र प्रार्थना करतो आहे.

    follow whatsapp