कोण आहेत MCA चे नवे अध्यक्ष अमोल काळे? देवेंद्र फडणवीसांशी काय आहे नातं?

अमोल काळे हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात चर्चिलं जातंय. त्याला कारण आहे एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक. अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष बनलेत. त्यामुळे काळे कोण आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमका काय संबंध? अशी चर्चा केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे अमोल काळे पहिल्यांदा चर्चेत आले नाही. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचं […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 10:18 AM • 21 Oct 2022

follow google news

अमोल काळे हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात चर्चिलं जातंय. त्याला कारण आहे एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक. अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष बनलेत. त्यामुळे काळे कोण आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमका काय संबंध? अशी चर्चा केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे अमोल काळे पहिल्यांदा चर्चेत आले नाही. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं.

हे वाचलं का?

एमसीए निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनल कडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्यापासूनच त्यांच्याभोवती चर्चा सुरू झाली होती. विशेषतः देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची जवळीक असल्याचं सातत्यानं सांगितलं जातंय.

MCA President : नागपूरकर अमोल काळे

अमोल काळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते मूळचे नागपूरचे आहेत. नागपुरातील अभ्यंकर नगर येथे राहतात. अमोल काळे यांचा मुख्य व्यवसाय ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय आहेत.

अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सुद्धा जवळचा संबंध आहे.

एमसीए निवडणूक : अमोल काळे कोणता व्यवसाय करतात?

अमोल काळे हे नागपूर महापालिकेत ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. ते रिअल इस्टेट, आरोग्य, लॉजिस्टिक्स, मीडिया व्यवस्थापन, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहेत. जे.के. सोल्युशन्स बरोबरच ते अर्पित एन्टरप्रायझेस या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

अमोल काळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध काय?

अमोल काळे हे सर्वात आधी चर्चेत आले ते २०१४ मध्ये. २०१४ मध्ये राज्यात भाजप व शिवसेना युतीचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, त्यानंतर. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. ते देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर होते, त्यावेळी अमोल काळे हे भाजपचे वार्ड अध्यक्ष होते.

अमोल काळे हे व्यासपीठावर सहसा वावरत नाहीत, परंतु पडद्यामागची भूमिका पार पाडण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

अमोल काळेंवर संजय राऊतांनी केला होता आरोप

अमोल काळे यांच्या जे.के. सोल्युशन्स या कंपनीला नागपूर शहरातील पथदिवे एलईडी लाईट्समध्ये परावर्तित करण्याचं कंत्राट मिळालं होतं. एलईडी पथदिवे लावल्यास आर्थिक बचत होईल, असा दावा करण्यात आला होता. त्यावरून बरेच वाद झाला होता. त्यामुळे काळे यांना हे कंत्राट मध्येच सोडावं लागलं होतं.

काही महिन्यांपूर्वी महाआयटी विभागातील घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमोल काळेंवर आरोप केले होते. “देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला. या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार आहे. या दोघांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले? विना टेंडर कुणाला कंत्राट दिलं गेलं? हा पैसा कुठे कुठे गेला याची तक्रार आपण करणार आहे. पाच हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आलेला आहे. याबाबतची सगळी माहिती मी संबंधित तपास यंत्रणांकडे देणार आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

    follow whatsapp