२२ वर्षीय टीकटॉक स्टार पुजा चव्हाणने पुण्यात केलेल्या आत्महत्येनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात दोन व्यक्तींच्या संभाषणांच्या ऑडीयो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुजा चव्हाणचा राजकीय नेत्यांसोबतचा संपर्क आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये बंजारा भाषेतील संवादामुळे विरोधी पक्षातील भाजपने शिवसेनेचे यवतमाळचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षांनी संजय राठोड यांचं नाव घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलेलं दिसतं आहे. पुजा चव्हाण प्रकरणात विरोधक ज्या संजय राठोडांवर आरोप करत आहेत ते आहेत तरी कोण आणि त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्द आपण जाऊन घेणार आहोत…
अवश्य वाचा – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा-फडणवीस
संजय राठोड हे बंजारा समाजून येतात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये केली. तरुण वयातच त्यांना यवतमाळचं शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष पद मिळालं. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात संजय राठोड यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २००४ साली झालेल्या निवडणुकीत संजय राठोड यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत पहिल्यांदा यवतमाळमध्ये भगवा फडकवला.
यानंतर यवतमाळमध्ये संजय राठोड यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या संजय देशमुखांना पराभवाचं पाणी पाजलं. यावेळी राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये संजय राठोड मोजक्या ५ आमदारांमध्ये होते. यानंतर आतापर्यंत संजय राठोड यवतमाळमध्ये शिवसेचेचं वर्चस्व राखून आहेत. या जोरावरच त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थानही देण्यात आलं. संजय राठोड यांच्याकडे सध्या वनखात्याचा पदभार आहे.
कोण आहेत संजय राठोड, जाणून घ्या थोडक्यात…
१) शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते म्हणून संजय राठोड परिचीत
२) २००४ साली यवतमाळच्या दिग्रज मतदार संघातून राठोड यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली. २००९ आणि २०१४ मध्येही राठोड दिग्रसमधून आमदार निवडून आले.
३) फडणवीसांच्या मंत्रीमंडळात संजय राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सह-पालकमंत्रीपदासोबत महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
४) महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्याचा पदभार आहे.
ADVERTISEMENT