फडणवीसांच्या ‘स्टिंग’मध्ये सापडलेले सरकारी वकील प्रविण चव्हाण कोण?

मुंबई तक

• 11:41 AM • 09 Mar 2022

गिरीश महाजनांसह भाजपच्या नेत्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनीच कट रचल्याचा सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. फडणवीसांनी थेट विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं नाव घेत संपूर्ण वृत्तांत सभागृहात वाचून दाखवला. त्याचबरोबर विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेन ड्राइव्हही दिला होता. फडणवीसांच्या स्टिंगमुळे प्रविण चव्हाण राज्यभर चर्चेत आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत प्रविण चव्हाण? […]

Mumbaitak
follow google news

गिरीश महाजनांसह भाजपच्या नेत्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनीच कट रचल्याचा सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. फडणवीसांनी थेट विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं नाव घेत संपूर्ण वृत्तांत सभागृहात वाचून दाखवला. त्याचबरोबर विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेन ड्राइव्हही दिला होता. फडणवीसांच्या स्टिंगमुळे प्रविण चव्हाण राज्यभर चर्चेत आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत प्रविण चव्हाण?

हे वाचलं का?

सध्या सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सुरुवातीला अॅड. चव्हाण हे डबघाईला आलेल्या पतसंस्था व सहकारी संस्थांच्या विरोधात गुंतवणूकदारांच्या बाजूने वकिली करत असत. त्यांनी चाळीसगाव पिपल्स सहकारी बँक, भडगाव येथील बिगरशेती सहकारी संस्था या प्रकरणात वकिली केली आहे.

‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’, फडणवीसांनी विधानसभेत Pendrive देऊन केलेला प्रत्येक आरोप जसाच्या तसा…

जळगाव घरकुल घोटाळ्यातील वकील स्व. एन.डी. सूर्यवंशी यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. घरकुल घोटाळा खटल्यात ते अॅड. सूर्यवंशी यांना सहकार्य करत असत. याच खटल्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गज गजाआड गेले होते.

जळगावमधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीच्या संचालकांविरोधातील खटल्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. सध्या ते जळगावातील नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेत सुरू असलेल्या भोईटे व पाटील गटात वादात भूमिका बजावत आहेत.

फडणवीसांनी ज्या सरकारी वकिलावर आरोप केले पाहा त्याच प्रवीण चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

याच प्रकरणावरून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटाच्या विरोधात गेल्यावर्षी निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात वकील म्हणून अॅड. चव्हाण हे मुख्य भूमिका बजावत आहेत.

    follow whatsapp