उद्धव ठाकरेंनी महिलेला मुख्यमंत्री करूयात अशी अनपेक्षित आणि वेगळी भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकणारी पहिली महिला कोण असू शकते? ही चर्चा पुन्हा सुरू झाली. खरंतर… महाराष्ट्राला याआधीच महिला मुख्यमंत्री मिळायला हव्या होत्या, असा एक सूर कायम उमटत आलाय. महाराष्ट्राची स्थापना होऊन 62 वर्ष लोटली आहेत, तरीही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का होऊ शकल्या नाही? उद्धव ठाकरे म्हणाले त्यानुसार जर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाल्या, तर त्या कोण असतील… महाराष्ट्रातील महिला राजकारण्यांना याबद्दल काय वाटतं? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा वेध…
ADVERTISEMENT
देशातल्या विविध राज्यात आतापर्यंत 16 महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. पण, त्यासाठीही देशाला 16 वर्ष वाट पाहावी लागली. 1963 ला सुचेता कृपलानी देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर अनेक मोठ्या राज्याचा कारभार महिलांनी सांभाळला. यात मायावती, उमा भारती, ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज, जयललिता ही काही उदाहरणं आहेत.
उत्तर प्रदेश, बिहारपासून इकडे दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत अशा 14 राज्यांची मुख्यमंत्री पदावर महिला विराजमान झाल्या आहेत. पण, यात पुरोगामी महाराष्ट्राचं नाव कुठेच नाही. मग… महाराष्ट्रात आतापर्यंत महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी का मिळाली नाही?
मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?
1994 ला महाराष्ट्रानं महिला धोरण आणलं. विशेष म्हणजे ज्या शरद पवारांनी हे धोरण आणलं आणि ज्या काँग्रेसच्या काळात हे धोरण आलं, त्या पक्षांत आतापर्यंत एकाही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेलं नाही. इतकंच काय तर आतापर्यंत शालिनीताई पाटील वगळता सक्रीय राजकारणात असलेल्या एकाही महिलेला महत्वाचं खातं मिळालेलं नाही.
शालिनीताई पाटील यांना ए. आर. अंतुलेंच्या काळात महसूल खातं मिळालं होतं. पण, त्यानंतर गृह, अर्थ, नगरविकास यापैकी कोणतंच महत्वाचं खातं महिला नेत्याला मिळालं नाही. महाराष्ट्रात महिलांना मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलं. पण, तेही मोजक्याच… त्यात काँग्रेस नेहमी आघाडीवर दिसते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये दोन तीन महिला असतात.
महाविकास आघाडी सरकारमध्येच यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्री होत्या. भाजपनंही महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. पंकजा मुंडे असू द्यात किंवा विद्या ठाकूर असू देत…यांना मंत्रिमंडळात स्थान तर मिळालं. पण, भाजपनंही महिलेला मुख्यमंत्रिपद दिलं नाही.
पंकजा मुंडेंनी तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे, असंही बोलून दाखवलं. पण, त्यानंतर पंकजा मुंडे या राजकारणात कुठंतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसलं. शिवसेनेत तर आतापर्यंत एकही महिलेला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात असं का घडतं? महाराष्ट्रात अजूनही महिलांचं राजकारणातलं वर्चस्व मान्य केलं जात नाहीये का? की त्यांच्या नेतृत्वावर राजकीय नेत्यांचा विश्वासच नाही? असं अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित राहतात.
Raut: ‘गायकवाड वेडा झालाय, हवं तर राज्यपालांना शिव्या दे…’, राऊतांची नवी खेळी
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण असू शकते?
आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देऊ असं म्हटलंय. पण, त्यांनी महिला मुख्यमंत्री दिले तर कोणत्या अशा महिला राजकारणी आहेत, ज्या मुख्यमंत्री होऊ शकतात?
सुप्रिया सुळे…
यात पहिलं नाव येतं, ते सुप्रिया सुळे यांचं… सुप्रिया सुळे या सध्या केंद्रीय राजकारणात असल्या, तरीही महिला मुख्यमंत्री म्हटलं की त्यांचं नाव चर्चेत असतं. सुप्रिया सुळे या केंद्राच्या राजकारणात राहतील, त्यांना राज्याच्या राजकारणात रस नाही, असं शरद पवारांनीही सांगितलं. तरीही सुप्रिया सुळे या राज्याच्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असं राजकीय जाणकार सांगतात.
राज्यात सरकार बनवण्यात राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली. राज्यात जर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे यांच्या संकेतानुसार महिला मुख्यमंत्र्यांना संधी मिळाली, तर त्यात सुप्रियांचं नाव आघाडीवर असेल.
Jitendra Awhad: “CM एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहित आहे ना? मी हे करू शकत नाही”
रश्मी ठाकरे…
यात दुसरं नाव म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे… महाविकास आघाडी तयार झाली, त्यावेळी रश्मी ठाकरेंची महत्वाची भूमिका होती, असं बोललं जातं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी आणि आताही त्या उद्धव ठाकरेंसोबत अनेक कार्यक्रमात दिसतात. रश्मी ठाकरे या पडद्यामागून शिवसेनेची धुरा सांभाळतात, ही चर्चा कायम राजकीय वर्तुळात असते.
इतकंच नाहीतर शिवसेनेच्या महत्वाच्या निर्णयात रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो, असंही बोललं जातं. शिवाय शिवसेनेत फूट पडण्याआधी रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र बघतात, त्यांना मुख्यमंत्री करा, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतून आणि शिवसेनेतून एका महिलेला मुख्यमंत्री बनवायचं झालं, तर त्यात रश्मी ठाकरेंचं एक नाव असू शकते.
पंकजा मुंडे…
तिसरं नाव येत ते पंकजा मुंडे! इंडिया टुडेचं कॉन्क्लेव्ह झालं, त्यात त्यांना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाल्या नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात सक्षम महिला आहेत. महिला म्हणून असं वाटतं, की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हव्या. हेच नाहीतर, पंकजा या राजकीय महत्वकांक्षा असलेल्या नेत्या आहेत. ओबीसी नेत्या, गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, लोकनेत्या अशी त्यांची ओळख…
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे ही त्यांनी बोलून दाखवलं. तसेच नेतृत्वासाठी देवेंद्र फडणवीसांसोबतचा संघर्षही आपण पाहिला. राज्यात महिलेला मुख्यमंत्री बनवायची संधी मिळाली, तर भाजपकडून त्यांना संधी मिळेल का? हे बघावं लागेल. पण, पंकजा नाराज असल्याच्या चर्चा ज्यावेळी रंगतात, त्यावेळी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्लाही दिला जातो. जर पुढे असं झालं, तर महाविकास आघाडीमधून पंकजांना ही संधी मिळू शकते.
हात पसरून कुणाकडे पद मागावं असे आमचे संस्कार नाहीत, पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा समोर
काँग्रेसमध्ये कोणते पर्याय?
याशिवाय, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर…हुशार राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं. २००९ पासून त्या तिवसा मतदारसंघातून निवडून येतात. मोदी लाटेतही त्यांनी त्यांची जागा राखली होती. शिवाय त्यांना विदर्भातल्या जनतेचा पाठिंबाही आहे. त्यामुळे काँग्रेसनं महिला मुख्यमंत्री द्यायचं ठरवलं, तर यशोमती ठाकूर यांचं नाव पुढे असेल…त्यांच्यासोबत वर्षा गायकवाड यांचंही नाव असू शकतं.
ADVERTISEMENT