सध्या सर्वच पक्षातील नेते सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहेत. मग ते देशाचे पंतप्रधान असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री, सरसकट ही नेतेमंडळी फेसबूक, ट्वीटरवर सक्रिय झाले आहेत. सर्वच प्रमुख पक्षाचे आयटी सेल कार्यरत आहेत. आता जर एखादा महत्वाचा निर्णय जाहीर करायचा असेल तर फेसबूक, यूट्यूबच्या माध्यमाने लाईव्ह येऊन केलं जातं. अनेक नेत्यांना याचा फायदा होत आहे.
ADVERTISEMENT
थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जात आहे. मात्र, हा माध्यम काहींसाठी डोकेदुखी देखील ठरत आहे. अनेकांना नेटकऱ्यांच्या तिव्र रोषाला देखील सामोरं जावं लागत आहे. अनेक नेत्यांच्या विरोधात भरपूर कमेंट येत आहेत. त्यामुळे ही नेतेमंडळी एक शक्कल लढवत आहेत. कमेंटच्या माध्यमाने येणाऱ्या टिकेपासून वाचण्यासाठी थेट कमेंट बॉक्सचं बंद करत आहेत, असा तर्क लावला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सोशल मीडियाचे कमेंट बॉक्स बंद
या नेतेमंडळीपैकी अशी शक्कल लढवणारे एक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी देखील फेसबूकचे कमेंट बॉक्स बंद केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टिकेपासून वाचण्यासाठी त्यांनी आपलं कमेंट बॉक्स बंद केलंय, अशी टीका त्यांच्यावर आता होत आहे. ट्रोलर्सच्या भितीने हा पाऊल उचलल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
कमेंट बॉक्स बंदवरुन राष्ट्रवादीने शिंदेंना घेरले
‘लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबूक पेजवरुन विचारण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बंद केलेला कमेंट बॉक्स हा चर्चेचा विषय बनला आहे. आता या विषायावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काय आहे नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजवरची पोस्ट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का? मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे.
ADVERTISEMENT