कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : काँग्रेसच्या विजयाचं, तर भाजपच्या पराभवाचं कारण काय?

मुंबई तक

• 03:04 PM • 16 Apr 2022

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक अत्यंत रंगतदार झाली होती. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना या ठिकाणी होता. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या सत्यजीत कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं हे म्हणणं आहे की आमच्यातल्या समन्वयामुळे आमचा विजय झाला. तर दुसरीकडे भाजपचं म्हणणं वेगळंच आहे. […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक अत्यंत रंगतदार झाली होती. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना या ठिकाणी होता. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या सत्यजीत कदम यांना पराभव स्वीकारावा लागला.

हे वाचलं का?

आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं हे म्हणणं आहे की आमच्यातल्या समन्वयामुळे आमचा विजय झाला. तर दुसरीकडे भाजपचं म्हणणं वेगळंच आहे. आम्ही आत्मपरीक्षण करू असं भाजपने म्हटलं आहे. मात्र कोल्हापूर उत्तरची जी जागा आहे ती शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. ज्यावेळी काँग्रेस निवडणूक लढवणार हे निश्चित झालं तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले होते. एवढे नाराज की शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नाही असंही सांगितलं होतं. राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर काँग्रेसचे कार्यकर्तेही जमा झाले होते.

शेवटी राजेश क्षीरसागर यांना उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावून घेतलं आणि सांगितलं की काँग्रेसचा प्रचार करावा लागेल.काँग्रेसच्या उमेदवाराचं निधन झाल्याने पोटनिवडणुकीत जागा काँग्रेसलाच मिळणार हेदेखील सांगितलं. हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचाच प्रचार करतील. मात्र या प्रकरणानंतर भाजपने हा दावा केला होता की अनेक शिवसैनिक या निर्णयावर नाराज आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खरा शिवसैनिक भाजपच्या पाठिशी उभा राहिल.

एवढं असूनही निकालात काय दिसतं आहे याचा विचार केला तर भाजपची मतं वाढलेली आहेत. तसंच काँग्रेसच्या मतांमध्येही वाढ झाली आहे. शिवसेनेची मतं कुठे गेली? हा खरा प्रश्न आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार ४९२ मतं मिळाली. एकूण मतदानाच्या ५४ टक्के मतं जयश्री जाधव यांना मिळाली. त्यांच्या मतांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २.२३ टक्के मिळाली आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवाराला म्हणजेच सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं पडली आहेत. भाजपच्या दृष्टीने विचार केला तर भाजपच्या मतांमध्ये ४३ टक्के वाढ झाली आहे. कारण भाजपने ही निवडणूक पहिल्यांदाच लढवली आहे. याआधी म्हणजे मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर मतदानाला उभे होते. त्यांचा पराभव करून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त होती. ज्याचा निकाल आज लागला आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कुठे कमी पडलो याचा अभ्यास करतो आहोत-चंद्रकांत पाटील

आता प्रश्न हा उरतो की २०१४ मध्ये ६८ हजारांपेक्षा जास्त मिळाली होती. चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलं आहे अनेक शिवसैनिकांच्या मनात होतं तरीही भाजपला ते मदत करू शकले नाहीत कारण शिवसेनेने निरीक्षक पाठवले होते. २०१९ च्या तुलनेत आत्ताच्या मतांकडे पाहिलं तर काँग्रेसची मतं ही सरासरी ६ हजारांनी वाढली आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं हे तितकंसं पटण्यासारखं नाही. आज ज्या जयश्री जाधव निवडून आल्या आहेत त्या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये भाजपचीही मतं आहेत यात काही शंका नाही. ही मतं शिवसेनेकडे गेली असती तर शिवसेनेला मिळाली असती. आता प्रश्न उरतो तो म्हणजे सेनेची मतं कुठे गेली ? तर याचं उत्तर अगदी साधं आहे. शिवसेनेची काही मतं काँग्रेकडे गेली आहेत पण काही मतं ही भाजपलाही मिळाली आहेत. कारण शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडली आहे.

जी आकडेवारी समोर येते आहे त्यामध्ये असं दिसतं की शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडली आहे. शिवसेना आणि भाजप यांची १ लाख मतं २०१४ ला होती. सत्यजीत हे कदम भाजपचे उमेदवार मतं होती. २०१४ मध्ये सत्यजीत कदम काँग्रेसमध्ये होते. त्यांना त्यावेळी ४७ हजार मतं पडली होती. यावेळी त्यांना ७७ हजार मतं पडली आहेत. त्यामुळे मतं भाजपचीही विभागली गेली आहेत हेदेखील दिसतं आहे. राजेश क्षीरसागर म्हणत आहेत की भाजपने आम्हाला दगा दिला होता त्याचा बदला आम्ही घेतला आहे.

कोल्हापुरातून काँग्रेसने उधळला विजयाचा गुलाल, भाजपला धूळ चारत मिळवला विजय

भाजपचे केशव उपाध्ये यांनी काय म्हटलं आहे?

काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेले तर २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे. आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे.

    follow whatsapp