शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आशिष शेलार का म्हणाले?

मुंबई तक

• 12:14 PM • 02 Jun 2021

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेलं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते एकनाथ खडसेंच्या घरी गेले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन भेटींवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. याबाबत संजय […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेलं मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं असं आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते एकनाथ खडसेंच्या घरी गेले होते.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन भेटींवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता फडणवीस आधी सिल्वर ओकवर गेले, त्यानंतर खडसेंच्या घरी गेले आता ते मातोश्रीवरही येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याबाबत जेव्हा आशिष शेलार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं की होय मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारलं.

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत यांनी दिलं उत्तर

मराठा मोर्चाला भाजपचा पाठिंबा

मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. महाविकास आघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा एकप्रकारे ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ केल्याची घणाघाती टीकाही शेलार यांनी केलीय. आज गळे काढणारे त्यावेळी आरक्षण नाकारत होते. आता भाजपला शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाकाने कांदे सोलू नका. आम्हाला संपूर्ण आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी घोषणा शेलार यांनी यावेळी केली.मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या, अशी मागणीही शेलार केलीय.

Damage Control ची गरज भाजपला नाही ठाकरे सरकारला आहे-फडणवीस

दरम्यान, फडणवीस यांनी 31 मे रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आपण शरद पवारांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती असं फडणवीस यांनी सांगितलं होतं. तसंच फडणवीस काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चहापान केलं. पत्रकारांनी विचारल्यावर रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. आमच्या खासदारांनी निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांच्या घरी चहासाठी गेलो. याचा कुणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असं फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp