देवेंद्र फडणवीस एवढ्या तात्काळ का गेले होते पोलीस स्थानकात?

मुंबई तक

• 06:27 AM • 18 Apr 2021

मुंबई: राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणाने देखील प्रचंड वेग घेतला आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन मंत्री नवाब मलिक यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठादारास मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याच प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बीकेसी पोलीस उपायुक्त कार्यालयात जाऊन पोलिसांनाच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणाने देखील प्रचंड वेग घेतला आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन मंत्री नवाब मलिक यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठादारास मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. याच प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बीकेसी पोलीस उपायुक्त कार्यालयात जाऊन पोलिसांनाच जाब विचारला आहे.

हे वाचलं का?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर तयार करणाऱ्या एका फार्मा कंपनीला हे औषध महाराष्ट्राला पुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर संबंधित कंपनीला निर्यात करण्याची परवानगी नसल्याचं समजलं.”

यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडून तसंच एफडीएकडून (अन्न आणि औषधं प्रशासन) परवानगी घेतली. परंतु शनिवारी संध्याकाळी बीकेसी पोलिसांनी फार्मामधील 2 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं त्यांना समजलं आणि त्यामुळेच त्यांनी पोलीस स्टेशनात धाव घेतली.

Remdisivir चा पुरवठा करताना महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव, नवाब मलिकांनी दिला पुरावा

यावेळी फडणवीस यांनी डीसीपी आणि अॅडिशनल सीपी यांच्याशी बोलून त्यांना तातडीने सोडण्याची मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती देताना डीसीपी मंजूनाथ शिंगे म्हणाले, ‘रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार होत असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली होती. याच मुद्द्यावरून आम्ही फार्मा कंपनीतील व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं होतं. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.’

महाराष्ट्राला Remdesivir विकाल तर कारवाई करू, मोदी सरकारची कंपन्यांना धमकी- नवाब मलिक

तर रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा करताना महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राने भेदभाव केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी केलेले हे आरोप खोटे असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे, नवाब मलिक यांना केवळ विधान करणं माहित आहे. सरकारला राज्यातील जनतेच्या जीवाशी काही देणं घेणं नसल्याचं, फडणवीस म्हणालेत.

    follow whatsapp