उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतले मानले जाणारे सनदी अधिकारी गोवा या ठिकाणी शिवसेनेच्या उठाव केलेल्या आमदारांना भेटायला गेल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र ते गोव्याला का गेले होते याचं कारण समोर आलं नव्हतं. ही बातमी चर्चिली गेल्यानंतर आता प्रवीण परदेशी गोव्याला नेमकं का गेले होते ते कारण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फेसबुकवर यासंदर्भातली पोस्ट लिहिली आहे. प्रवीण परदेशी हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी गोव्यात आले होते त्यामुळे मी त्यांना भेटलो आणि त्यांचं तसंच त्यांच्या कुटुंबाचं अभिनंदन केलं. असं मंगेश चिवटे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे.
२१ जूनला जे बंड महाराष्ट्रात झालं आणि त्यानंतर जे सत्तानाट्य सुरू झालं त्यात विविध प्रकारचे ट्विस्ट अँड टर्न महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी नाट्यमय रित्या घडल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता याच फडणवीस यांचे अत्यंत जवळचे अधिकारी गोव्यात बंडखोर आमदारांच्या सदिच्छा भेटीला का गेले होते याची चर्चा रंगली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणी मंगेश चिवटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपण त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे.
प्रवीण परदेशी यांनी मे २०१९ मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याही आधी प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं होतं. परदेशी यांनी त्यांच्या ३० वर्षांहून जास्त कार्यकाळात लातूर तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलंय.
कोण आहेत प्रवीण परदेशी? (Praveen Pardeshi)
प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत
प्रवीण परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलंय
प्रवीण परदेशी यांनी २०१९ मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता
प्रवीण परदेशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या लोकांपैकी एक अधिकारी असल्याचं मानलं जातं
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना प्रवीण परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसंच महसूल या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेच प्रवीण परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून आणलं होतं.
ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना जेव्हा मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी काही तासातच राजीनामा दिला त्यानंतर ते केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपसिटी बिल्डिंग कमिशनचे सदस्य म्हणून रूजू झाले.
ADVERTISEMENT