महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचं म्युटेशन झालं आणि डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरिएंट पाहण्यास मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत घातक होती हे पाहण्यास मिळाली. व्हायरसमध्ये म्युटेशन आल्याने या कोरोनाचा संसर्ग वाढला. डेल्टा व्हेरिएंट हा जास्त संसर्ग पसरवणारा होता. दुसऱ्या लाटेत त्याचा प्रभाव जास्त होता हे आपण पाहिलंच. आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्युटेशनबाबत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
Delta Plus व्हेरिएंटविरूद्ध कोरोना लस किती प्रभावी, लस नव्या व्हेरिएंटशी लढू शकते?
महाराष्ट्रात म्युटेशन का वाढलं?
जेव्हा एखादा व्हायरस माणसाच्या शरीरात रेप्लिकेट होतो तेव्हा म्युटेशन होतं. काही म्युटेशन ही व्हायरसचा प्रभाव वाढवतात. देशात अशी काही राज्यं पाहण्यास मिळाली जिथे म्युटेशन जास्त झालं. महाराष्ट्र हे त्यापैकीच एक राज्य आहे. या राज्यात कोरोना व्हायरसला म्युटेशन होण्यासाठीचं जे अवकाश होतं ते मोठ्या प्रमाणावर मिळालं. महाराष्ट्रात व्हायरस म्युटेशनचं प्रमाण वाढलं हे पाहिलं गेलं. महाराष्ट्रात केसेस जास्त होत्या. त्यामुळे म्युटेशनही मोठ्य़ा प्रमाणावर झालं हे पाहण्यास मिळालं. जर व्हायरस आणि माणूस यांचा संपर्क आल्यानंतर सुरूवातीला माणसाच्या प्रतिकार शक्तीमुळे व्हायरसवर मात करता येऊ शकते. मात्र बऱ्याचदा असंही घडतं की व्हायरस जास्त प्रभावी ठरतो. कोरोनाच्या बाबतीतच नाही तर कुठल्याही व्हायरसच्याबाबतीत म्युटेशन हे असंच होतं.
समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?
आता तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे. अशात सर्वात महत्त्वाचं आहे ते कोव्हिड अप्रोपिएट बिव्हेविअर. ते जर नीट आणि व्यवस्थित असेल तर कोरोनाची दुसरी लाट असो, तिसरी लाट असो किंवा दहावी लाट असो तुम्ही त्यावर मात करू शकता. योग्य ती काळजी घेतली नाही तर मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणं हे क्रमप्राप्त आहे. मास्क, सुरक्षित अंतर आणि हात सॅनेटाईझ करणं सोडू नका. आत्ता आपण दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यातही असू पण अशावेळी ही कोव्हिड अप्रोप्रिएट बिव्हेविअर पाळणं महत्वाचं आहे. व्हायरसने कसं वागायचं त्यात काय म्युटेशन होईल हे आपल्या हातात नाही. पण आपण कसं वागायचं आणि व्हायरसला रोखायचं ते आपल्या हातात आहे असंही लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT