इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी टेस्ट अर्थात कौमार्य चाचणीवरून प्रचंड गदारोळ माजला आहे. हा गदारोळ फक्त कौमार्य चाचणीवरून नाही तर Hymen Repair Surgery वरूनही होतो आहे. बहुतांश ब्रिटिश खासदारांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून ब्रिटिश खासदार एंटनी हिगिनबॉथम आणि त्यांच्या सहकारी सारा ब्रिटक्लिफ हे एका क्रॉस पार्टी आघाडीत सहभागी झाले आहेत. Stephen Metcalfe यांनीही याच मुद्द्यावरून क्रॉस पार्टीमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
या सगळ्या गदारोळामुळे ही चर्चा होते आहे की हायमन रिपेअर सर्जरी आणि व्हर्जिनिटी टेस्ट नेमकी काय असते? त्यावरून इतका वाद का होतो आहे? इंग्लंडमधले खासदार या दोन्हीही गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने करत आहेत. हायमन रिपेअर सर्जरीला बेकायदेशीर घोषित करण्यात यावं अशी मागणी सातत्याने करण्यात येते आहे. इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी टेस्ट आणि हायमन रिपेअर सर्जरी किंवा ज्याला हायमेनोप्लास्टीही म्हटलं जातं ते सध्याच्या घडीला कायदेशीर आहे.
व्हर्जिनिटी टेस्ट का चर्चेत आहे?
गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटिश खासदारांनी क्रॉस पार्टीला साथ दिली आहे. या टेस्टच्या विरोधात दीर्घ काळापासून आवाज उठवला जातो आहे. व्हर्जिनिटी टेस्ट आणि हायमन रिपेअर या दोन्ही गोष्टी सध्या इंग्लंडमध्ये कायदेशीर आहेत. या दोन्हीवरून महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातो आहे. लग्न होण्याच्या आधी ही टेस्ट केली जाते त्यामुळे हा कायदा असला तरीही तो महिलांच्या विरोधात असलेला कायदा आहे त्यामुळे एक मोठा वर्ग याचा विरोध करतो आहे.
काय असते व्हर्जिनिटी टेस्ट?
व्हर्जिनिटी टेस्ट ही एक वादग्रस्त प्रथा आहे असंच म्हणता येईल कारण या टेस्टद्वारे हे समजतं की महिलेने शारिरीक संबंध ठेवले आहेत की नाही. अनेक ठिकाणी लग्नाच्या आधी ही टेस्ट करणं आवश्यक मानलं जातं. त्यावरून महिलांचं चारित्र्य काय आहे ते ठरवलं जातं. त्यामुळेच या चाचणीला विरोध दर्शवला जातो आहे.
काय असते हायमन रिपेअर सर्जरी किंवा हायमेनोप्लास्टी?
जर एखाद्या महिलेने शरीरसंबंध ठेवले तर तिचं हायमन तुटतं. हे हायमन सर्जरी करून पुन्हा जोडता येतं. यालाच हायमन रिपेअर सर्जरी किंवा हायमेनोप्लास्टी म्हटलं जातं. याद्वारे तुटलेलं हायमन पुन्हा जोडलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर अशी समजूत आहे की या सर्जरीद्वारे कौमार्य परत मिळवता येतं. ही सर्जरी केल्यानंतर महिला/मुली पूर्णतः व्हर्जिन दिसतील. या शस्त्रक्रियेसाठी भरमसाठ फी देखील आकारली जाते.
हायमन रिपेअर सर्जरीला किंवा व्हर्जिनिटी टेस्टला विरोध का होतो आहे?
विवाहाच्या पहिल्या रात्री रक्तस्त्राव होणं आवश्यक आहे या समजुतीतून महिला आणि मुलींवर ही शस्त्रक्रिया केली जाते. युनायटेड किंग्डम मधील कायदे तज्ज्ञांचा हा विश्वास आहे की या वेदनादायक पद्धतींना मेडिकल सायन्सचा ठोस असा काही आधार नाही. अशा गोष्टी या फक्त स्त्रियांना किंवा मुलींना हानी पोहचवतात. व्हर्जिनिटी चाचणी किंवा हायमन दुरूस्ती शस्त्रक्रिया टाळण्यासाठी त्वरित पावलं उचलली गेली पाहिजेत. अनेकदा महिलांना त्यांची इच्छा नसतानाही या चाचणीला किंवा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागतं. या सगळ्याच मुद्द्यांवरून या टेस्टला आणि ऑपरेशनला विरोध होतो आहे.
ब्रिटिश डॉक्टरांनी व्हर्जिनिटी रिपेअर शस्त्रक्रियेविरोधात आवाज उठवला आहे.जोपर्यंत ‘व्हर्जिनिटी चाचणी रिपेअर’ च्या नावाखाली बनावट ऑपरेशन्स बंद होत नाहीत, तोपर्यंत व्हर्जिनिटी चाचणीबाबत कायदा बनवून उपयोग नाही, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट (आरसीओजी) ने सरकारला इशारा दिला आहे आणि व्हर्जिनिटी चाचणी रिपेअर शस्त्रक्रियेवर कठोर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर तेथील डॉक्टरांनी व्हर्जिनिटी चाचणी रिपेअर शस्त्रक्रिया करणाऱ्या रूग्णालयांवर आणि डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली जाते आहे.
ADVERTISEMENT