फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रांचने एक केस मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ही केस अश्लील फिल्म किंवा ज्याला पॉर्न फिल्म म्हणता येईल अशा संदर्भातली होती. या केसच्या तपासात असं निष्पन्न झालं होतं की फिल्ममध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवख्या महिला कलाकारांना वेब सीरिज किंवा शॉर्ट फिल्ममध्ये चांगला ब्रेक देतो असं आमिष देऊन त्यांना ऑडिशनसाठी बोलवण्यात येत असे. वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन करावे लागतील असं सांगण्यात यायचं. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आज राज कुंद्राची या प्रकरणात या मोडस ऑपरेंडी होती ते स्पष्ट केलं. मुंबई पोलीस खात्याचे जॉईंट सीपी मिलिंद भारांबे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
या बोल्ड सीनमध्ये काही सेमी न्यूड आणि न्यूड सीनही चित्रित करण्यात यायचे. याला महिला कलाकारांनी आक्षेप घेतला होता आणि हीच तक्रार घेऊन यातल्या काही महिला कलाकारांनी पोलीस ठाणं गाठलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना असं लक्षात आलं की छोटे छोटे सीन किंवा शॉर्ट स्टोरीज तयार करून काही वेबसाईट्स आणि काही मोबाईल अॅप्सना विकल्या जात होत्या. यामध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उमेश कामत, रोहा खान, गहना वसिष्ठ, तन्वीर हश्मी असे आरोपी अटकेत केले आहेत. हे वेगवेगळ्या अॅप्सला हे लोक हा कंटेंट विकत असत. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर या प्रकरणी पुढील अकाऊटिंग होत असे.
हे Apps वेगवेगळे होते. यातला उमेश कामत हा जो व्यक्ती आहे तो इंडिया हेड होता. तसंच राज कुंद्राच्या कंपनीत इंडियाचं ऑपरेशन्स बघायचा. आम्ही या प्रकरणी सखोल तपास केला असता हे लक्षात आलं राज कुंद्राची विहान नावाची कंपनी या कंपनीचं केंन्रिन नावाच्या कंपनीशी टाय अप होतं. ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या बहिणीचा नवरा हेच ही कंपनी ऑपरेट करत आहेत. त्यांचं एक अॅप होतं ज्याचं नाव होतं हॉटशॉट. ही कंपनी आणि हे अॅप हे जरी लंडनस्थित असलं तरीही त्याचं सगळं कंटेंट क्रिेएशन या अॅपचं सगळं अकाऊंटिंग विहान कंपनीच्या ऑफिसमधूनच होत होतं. ही कंपनी राज कुंद्राची आहे. हे सगळे धागेदोरे सापडले आहेत.
पुरावा म्हणून आम्हाला त्यांचे काही व्हॉट्स अॅप ग्रुप सापडले, इमेल मिळाले. त्याचप्रमाणे अकाऊटिंगच्या फाईल्सही मिळाल्या. हॉटशॉट्सवर ज्या चित्रफिती दाखवण्यात आल्या त्याही मिळाल्या. कोर्टाची संमती घेऊन ऑफिसची झडती घेण्यात आली त्यामध्येही या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यानंतरच तपासाअंती राज कुंद्रा आणि रायन थ्रॉर्प या दोघांना अटक केली आहे. हॉटशॉट हे अॅप पोर्नोग्राफिक कंटेट आहे त्यामुळे अॅपल स्टोअरने ते टेकडाऊन केलं आहे. गुगल प्ले स्टोअरनेही अॅप डाऊन केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. आता मुंबई पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT