पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्यामुळे पत्नीने सोलापुरात रेल्वे खाली उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत पती पत्नी दोघेही मंगळवेढा तालुक्यातील शरद नगर येथील आहेत.
ADVERTISEMENT
आप्पासो रावसाहेब कोरे (वय.38 ), अनुसया आप्पासो कोरे ( वय.33 ) असं मृत पती-पत्नीचे नाव आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी आप्पासो कोरे यांना निमोनिया सदृश्य आजार झाल्यामुळे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वे खाली उडी मारत आत्महत्या केली.
पतीच्या उपचारा दरम्यान झालेला खर्च व पतीला वाचण्यात आलेले अपयश या कारणांनी व भविष्यातील जगण्याचा आधार हरपल्यामुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने पतीबरोबर पत्नीने जगाचा निरोप घेतला.कोरे दाम्पत्याला एक पाच वर्षाचा मुलगा असून या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.
ADVERTISEMENT