नवरा मेल्याचे सांगून महिला तब्बल 10 वर्षापासून ‘असं’ फसवत होती सरकारला, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 10:22 AM • 03 Feb 2022

भोपाळ: मध्य प्रदेशात एक असं फसवणुकीचे प्रकरण समोर आलं आहे की, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अवघ्या काही हजाराच्या पेन्शनसाठी एका महिलेने चक्क आपल्या जिवंत पतीचा मृत्यू झाल्याचं सांगतिलं होतं. पती मृत असल्याचे भासवून महिला सरकारकडून तब्बल 10 वर्षापासून पेन्शन घेत असल्याचं आता समोर आलं आहे. यावेळी महिलेने बीपीएम कार्डही बनवून घेतले […]

Mumbaitak
follow google news

भोपाळ: मध्य प्रदेशात एक असं फसवणुकीचे प्रकरण समोर आलं आहे की, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अवघ्या काही हजाराच्या पेन्शनसाठी एका महिलेने चक्क आपल्या जिवंत पतीचा मृत्यू झाल्याचं सांगतिलं होतं. पती मृत असल्याचे भासवून महिला सरकारकडून तब्बल 10 वर्षापासून पेन्शन घेत असल्याचं आता समोर आलं आहे.

हे वाचलं का?

यावेळी महिलेने बीपीएम कार्डही बनवून घेतले होते. दरम्यान, हा सगळा प्रकार महिलेच्या पतीनेच उघड केला आहे. ही फसवणूक पतीला समजताच त्याने याप्रकरणी पोलिसात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून महिलेला अटक करून कारागृहात पाठवले आहे.

पतीला कागदावर मृत दाखवून आरोपी महिला गेल्या 10 वर्षांपासून विधवा पेन्शन घेत होती. पोलिसांनी सांगितले की, केशवगंज वॉर्डातील रहिवासी असलेल्या आरोपी महिलेचे 2001 मध्ये अशोकनगर येथील रहिवासी मोहम्मद अख्तर रैन खान यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर अख्तर सागर येथे राहत होता. पण काही वर्षानंतर कौटुंबिक वादामुळे अख्तर हा अशोकनगर येथे राहायला गेला होता. 2017 साली अशोकनगर पोलीस स्थानकात अख्तरने पत्नी शमीम ही सरकारची फसवणूक करत असल्याचं म्हणत तक्रार दाखल केली होती.

तपास अधिकारी संगीता सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण 2017 सालचे आहे. मोहम्मद अख्तर याने तक्रार केली होती की, गोपालगंजमध्ये त्याच्या पत्नीने एक ओळखपत्र बनवलं आहे. ज्यामध्ये तिने पतीचा मृत झाल्याचे सांगितले होते आणि ती विधवा पेन्शन आणि बीपीएल कार्डमधून रेशन घेत होती.

Crime: चर्चचा पाद्री निघाला विकृत नराधम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पत्नी करायची व्हीडिओ शूट

पोलिसांनी आरोपी महिलेला केलं अटक

तपासादरम्यान, महिलेचा पती जिवंत असल्याचं माहिती समोर आली. ज्याची पडताळणी देखील करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी महिलेवर 420 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कागदपत्राच्या आधारे फसव्या पद्धतीने सरकारी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी 467, 468 कलमाची वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या कलमांच्या अतंर्गत पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केलं. जिथून तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    follow whatsapp