पतीकडून पत्नीच्या प्रियकराला गुप्तांगावर ‘ओलिनी स्प्रे’ मारत जबर मारहाण, अनैतिक संबंध असल्याचा संशय

मुंबई तक

23 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

समीर शेख, पुणे, प्रतिनिधी पुणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कथित प्रियकराचे अपहरण करून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ‘ओलिनी स्प्रे’ मारुन त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रसंगी त्याचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या अजय पवार […]

Mumbaitak
follow google news

समीर शेख, पुणे, प्रतिनिधी

हे वाचलं का?

पुणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कथित प्रियकराचे अपहरण करून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ‘ओलिनी स्प्रे’ मारुन त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रसंगी त्याचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या अजय पवार याला त्याच्या पत्नीचे मनोहर या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. अजयने त्याचा साथीदार प्रमोद चासदार याच्यासोबत मनोहरच्या अपहरणाचा कट रचला.

रणवीर सिंगच्या फोटोशूटवर अबू आझमींचा आक्षेप; न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र्य, मग हिजाब…

त्यानंतर अजय आणि प्रमोद यांनी मनोहरचे वाकड भागातून कारमधून अपहरण केले. त्यानंतर बाणेर भागातील त्यांच्या एका फ्लॅटमध्ये बळजबरीने डांबून ठेवले आणि त्याच्या गुप्तांगावर ‘ओलिनी स्प्रे’ मारून मारहाण केली. पोलिसांना मनोहरच्या मित्राने याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी मनोहरची सुटका केली, दरम्यान अजयचा साथीदार प्रमोद पोलिसांची नजर चुकवून तेथून पळून गेला आहे.

या घटनेबाबत वाकड पोलिसांनी कथित प्रियकर मनोहर वेताळच्या तक्रारीवरून अजय आणि प्रमोद यांच्या विरोधात अपहरण आणि जबरदस्तीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यासोबतच पोलिसांनी अजयकडून ती आलिशान कारही जप्त केली आहे.

दोन्ही आरोपी काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. मनोहरचे आरोपीच्या बायकोसोबत खरच अनैतिक संबंध होते का याची माहिती अजून मिळालेली नाही. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. संबंधीत घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले म्हणून बरे झाले नाहीतर मनोहरच्या जिवाचे बरेवाईट झाले असते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp