नाशिक शहरात गंगापूर रोडवरील एका वाईन शॉपमध्ये चोरट्याने शटर उचकटून ९८ हजाराची दारु लंपास केली आहे. चोरट्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
गंगापूर रोडवरील स्टर्लिन अपार्टमेंटमध्ये समाधान वाईन मार्ट नावाचं दुकान आहे. चोरट्याने रात्रीच्या अंधारात दुकानाचं ग्रिल आणि शटर उचकटून आत प्रवेश केला. यानंतर त्याने दुकानातील जॉनी वॉकर ब्रँडच्या ३ बाटल्या, गोल्ड लेबल ३ बाटल्या, जॉनी वॉकर लो लॕन्ड ४ बाटल्या, जॉनी वॉकर स्पेस साईट ४ बाटल्या, जॉनी वॉकर सिंगल टर्न (१८ वर्षे जुनी) २ बाटल्या,जॉनी वॉकर लो लँड (१५ वर्षे जुनी) २ बाटल्या, आर्टबर्ग ३ बाटल्या, कावा लॕन्ड २ बाटल्या, ग्लेन मोरंजी लासंटा १ बाटली, ग्लेन ग्रान्ट (दहा वर्षे जुनी) १ बाटली तसेच १३ हजार ५०० रुपये असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
समाधान वाईन्सचे व्यवस्थापक रविंद्र विठ्ठल साळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत
ADVERTISEMENT