मुंबईत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र सध्या अनेक लोक कसातरी पास किंवा तिकीट मिळवून प्रवास करत असतात. अशाच एका महिलेला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा तिने प्रचंड हंगामा घातला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दुषणं दिली. एवढंच नाही या सगळ्याचं तिने फेसबुक लाईव्हही केलं. ज्यानंतर या महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा सुमारे 25 मिनिटांचा व्हीडिओ आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरचा हा व्हीडिओ आहे. या महिलेचं नाव काय ते समजू शकलेलं नाही. मात्र या महिलेकडे तिकिट असूनही ती अत्यावश्यक सेवेत किंवा ज्यांना ट्रेनने प्रवासाची संमती देण्यात आली आहे अशा प्रवाशांमध्ये या महिलेचा समावेश होत नाही. त्यामुळे या महिलेला 500 रूपये दंड भरण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर ही महिला आक्रमक झाली. तसंच या महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे असंही वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाली ही महिला?
माझ्याकडे दंड भरण्यासाठी 500 रूपये नाहीत. माझ्यावर कारवाई करा. मला इथे किती वेळ बसवायचं आहे ते बसवा आता तर मी मास्कपण नाही लावणार. त्याचा पण दंड मी भरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे ऐकावं. हा महिलांवर होणारा अत्याचार आहे. माझ्याकडे पैसे नाहीत मी दंड भरणार नाही. या सरकारने माझ्यावर कारवाई करावी. या सरकारचा निषेध आहे. उद्धव ठाकरेंचा पण निषेध आहे. अशा प्रकारे महिलांना वेठीस धरणे चुकीचे आहे. आम्ही नोकरी केली नाही तर पैसे कुठून आणायचे? उद्धव ठाकरे सरकारचा निषेध आहे. असं या महिलेने म्हटलं आहे.
मी कोरोनामुळे मेली तरीही चालेल असंही या महिलेने म्हटलं आहे. मी तिकिटाशिवाय प्रवास करत नाही. कोणत्या नियमांखाली कारवाई करता तेच बघू.. असं म्हणत ही महिला रेल्वे स्थानकावरील टीसी ऑफिसमध्ये जाऊन बसली. या सरकारचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धिक्कार आहे. मुख्यमंत्री ही बघा ही परिस्थिती आहे. तुम्ही प्रेमाने बोलता ना? गोड बोलताय ना? मग मला सांगा माझ्याकडे दंडाचे पैसे नाहीत. मी पैसे कुठून भरायचे. माझ्याकडे मास्कच्या दंडाचे पैसे नाहीत भरायला बघू माझ्यावर किती केसेस होतात. असंही महिला तिच्या व्हीडिओत म्हणते आहे. कोरोनामुळे मी मेले तरीही चालेल. मी मास्क लावणार नाही, कोरोनाचं सगळं थोतांड आहे. मी कॅमेरा सुरू ठेवणार तुम्ही कारवाई करा असंही ही महिला म्हणाली.
पाहा व्हीडिओ
ADVERTISEMENT