Panvel Crime: घरापर्यंत सोडतो म्हणाला अन् केला गँगरेप, रात्री काय घडलं?

मुंबई तक

31 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

Woman gang-raped by auto driver and his friend in panvel : सामूहिक बलात्काराच्या (gang-rape) घटनेनं पनवेल हादरलं. मध्यरात्री घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानेच (auto driver and his friend) सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. निर्मनुष्य असलेल्या एका इमारतीच्या छतावर नेऊन आरोपींनी हे कृत्य केलं. महिलेनं ही आपबीती पोलिसांना सांगितली, तसेच तक्रार […]

Mumbaitak
follow google news

Woman gang-raped by auto driver and his friend in panvel : सामूहिक बलात्काराच्या (gang-rape) घटनेनं पनवेल हादरलं. मध्यरात्री घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानेच (auto driver and his friend) सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. निर्मनुष्य असलेल्या एका इमारतीच्या छतावर नेऊन आरोपींनी हे कृत्य केलं. महिलेनं ही आपबीती पोलिसांना सांगितली, तसेच तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. दुसरा आरोपी फरार असून, पोलीस आता त्याचा शोध घेत आहे. (Woman gang-raped in panvel)

हे वाचलं का?

पीडित महिला कामानिमित्त पनवेल येथे आली. रविवारी (30 जानेवारी) मध्यरात्री जवळपास 2 वाजता महिलेला घरी जायचं होतं. त्यानंतर पीडितेनं घरी जाण्यासाठी रिक्षा बुक केली. महिला रिक्षामध्ये बसली, त्यावेळी रिक्षामध्ये चालकासह त्याचा एक मित्रही होता.

निर्मनुष्य इमारतीच्या छतावर नेऊन केला बलात्कार

दरम्यान, महिलेला घेऊन रिक्षा निघाला. महिला एकटीच असल्याचं बघून रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राची नियत खराब झाली. रिक्षाचालक महिलेला म्हणाला की, घरापर्यंत सोडतो, पण महिलेने सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा न नेता रिक्षाचालकाने निर्मनुष्य ठिकाण दिसताच रिक्षा वळवला. पुढे निर्मनुष्य इमारत बघून त्यांनी रिक्षा थांबवला. नंतर दोन्ही आरोपींनी महिलेला रिक्षातून खाली उतरवलं आणि जबरदस्ती इमारतीच्या छतावर घेऊन गेले. छतावर नेल्यानंतर दोन्ही आरोपींनी महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

vaishali takkar : वैशालीच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर

Gang rape in panvel : अत्याचार करून फरार झाले फरार

महिलेवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर दोन्ही आरोपी पीडित महिलेला तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर निर्मनुष्य ठिकाण असल्यानं पीडित महिला कसंतरी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि झालेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

Shraddha Walker: श्रद्धाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ठोकल्या बेड्या

महिलेनं पोलिसांना घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती दिली. यात कोणत्या रस्त्याने आणि कुठे नेऊन अत्याचार करण्यात आले, त्याचीही माहिती दिली. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातील एका सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचालक आणि त्याचा मित्र महिलेला घेऊन जाताना दिसत असल्याचं आढळून आलं. त्यानुसार पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

पनवेल पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांनी सांगितलं की, सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी फरार झाला आहे. दुसऱ्या आरोपीचा तपास पोलीस करत असून, महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

    follow whatsapp