Pune: १७ वर्षांनी जुळ्या मुलींना जन्म दिला आणि कोरोनानं घात केला; पुण्यातील मन हेलावून टाकणारी घटना

मुंबई तक

• 10:48 AM • 16 Apr 2021

पिंपरी-चिंचवड: पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या एका महिलेचा अवघ्या 24 तासात कोरोनाने (Corona) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी३ 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी न घेतल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश […]

Mumbaitak
follow google news

पिंपरी-चिंचवड: पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या एका महिलेचा अवघ्या 24 तासात कोरोनाने (Corona) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी३ 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी न घेतल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश देऊ असं आश्वासन मात्र दिलं आहे.

हे वाचलं का?

आशा वंशीव या महिलेने सोमवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन चिमुकल्या बाळांना जन्म दिला. पण त्यानंतर तिची ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाली. त्यामुळे डॉक्टरांनी तिला तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात यावं असं सुचवलं.

याबाबत महिलेचा पती कालिदास वंशीव यांनी अशी माहिती दिली की, ‘YCMH च्या डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर आम्ही ससून रुग्णालयात धाव घेतली आणि तिथे आयसीयू बेड आहे की नाही याचा तपास केला. यावेळी तेथील डॉक्टरांनी सांगितलं की, तिला रुग्णालयात घेऊन या तेव्हा ठरवलं जाईल की, तिला दाखल करुन घ्यायचं किंवा नाही. हे कसं काय शक्य होतं? यानंतर आम्ही आणखी दोन रुग्णालयांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे आयसीयू बेड उपलब्ध नव्हते.’

कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू, बातमी समजताच पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी घटना

रात्री 11 वाजेच्या सुमारास YCMH प्रशासनाने शेवटी आपल्याच रुग्णालयात एका व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था केली. पण कालिदास यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीला व्हेंटिलेटर बेडपर्यंत घेऊन जाण्यास येथील स्टाफने कोणतीही मदत केली नाही. यावेळी कालिदास स्वत: आणि त्यांच्या एका नातेवाईकाने आशाला कोव्हिड रुममधून स्ट्रेचरवर आयसीयूमध्ये दाखल केलं. ‘जेव्हा आम्ही आशाला आयसीयूमध्ये नेलं तेव्हा तेथील डॉक्टरांना माहितच नव्हतं की, रुग्णाला कशासाठी येथे आणलं आहे.’

‘जेव्हा आशाला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं जात होतं तेव्हा तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आयसीयूमध्ये शिफ्ट करा असं ती आपल्या पतीला सांगत होती.’ अखेर या सगळ्या दिरंगाईमुळे आशाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आपल्या पत्नीच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप कालिदास वंशीव यांनी केला आहे.

कालिदास असंही म्हणाले की, ‘दोन मुलींचा जन्म हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी खरं तर खूप आनंदाचा क्षण होता. कारण जवळजवळ 17 वर्षानंतर त्यांना बाळ होणार होतं. आम्हाला बाळ व्हावं यासाठी देवाकडे बरीच प्रार्थना केली. अखेर 17 वर्षानंतर आम्हाला ते सुख देखील लाभलं पण ते फार वेळ टिकू शकलं नाही.’

Second Wave : भारतात एवढ्या झपाट्याने का पसरतो आहे कोरोना?

या संपूर्ण प्रकरणाने त्यांना खूपच धक्का बसला आहे. त्यांना आपल्या दोन चिमुकल्या मुलींच्या जीवाची देखील आता धास्ती वाटू लागली आहे. खरं तर त्या दोघींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण तरीही घडल्या प्रकाराने त्यांना आता एकूण आरोग्य व्यवस्थेविषयी चीड निर्माण झाली आहे. दुसरीकडे त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.

दरम्यान, दोन्ही मुलींविषयी येथील डॉ. दीपिका अंबिके यांनी अशी माहिती दिली की, दोन्ही मुली या एनआयसीयूमध्ये आहेत आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांची संपूर्ण देखभाल देखील केली जात आहे. त्यांना 10 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

    follow whatsapp