गुरुग्राम: हरियाणामध्ये एक महिलेने प्रियकराच्या साथीने आपल्या मोठ्या दिराची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पती त्याच्या मोठ्या भावासोबत दारू पित असल्याचं समजल्याने महिलेने चिडून दिराचीच हत्या केली. हत्येनंतर प्रियकराच्या साथीने तिने दिराचा मृतदेह गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावरील झुडपाजवळ फेकून दिला.
ADVERTISEMENT
वास्तविक, महिलेला असं सतत वाटायचं की, मोठ्या दिरानेच आपल्या पतीला दारूचे व्यसन लावले आहे आणि त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होत आहे. यामधून तिची आपल्या दिराविषयी चीड निर्माण झाली होती आणि त्याच रागातून तिने मोठ्या दिराचाच काटा काढला. सध्या या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
एसीपींच्या म्हणण्यानुसार, 1 फेब्रुवारी रोजी गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावरील खुशबू चौकाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. ज्याचा तपास क्राईम युनिट सेक्टर-40 कडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान मृत इकरारची हत्या त्याच्याच भावाच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
दरम्यान, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत आरोपींनी सांगितले की, मयत इकरार आणि तिचा पती इब्राहिम एकत्र बसून दारू प्यायचे. त्यामुळे घरात सतत भांडणं व्हायची त्यामुळे पती इब्राहिम हा वेगळा राहू लागला होता. यामुळेच महिलेने प्रियकरासह आपल्या पतीच्या भावाची निर्घृण हत्या केली.
एसीपी प्रितपाल सिंह यांनी सांगितले की, आरोपी महिला तिचा पती इब्राहिमसोबत गुरुग्राममध्ये 8 वर्षांपासून भंगाराचे दुकान चालवत होती. महिलेचा प्रियकर नहीम अल्वी उर्फ मुसरफ हा देखील तिच्यासोबत काम करायचा आणि त्याच दुकानात राहत होता. महिलेचा मोठा दीर इकरार याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो अनेकदा त्यांच्या दुकानात येत असे. त्यावेळी तो आपल्या लहान भावाला म्हणजेच इब्राहिमला देखील दारू पाजत असे.
वहिनीकडे काम करू नकोस सांगणाऱ्या दिराची कामगाराने तलवारीचे वार करत केली हत्या
मात्र इब्राहिमच्या पत्नीला हे अजिबात आवडत नव्हतं. यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं देखील व्हायची. मात्र, तरीही इब्राहिमचं भावासोबत दारु पिणं कमी झालं नव्हतं. त्यामुळेच आपल्या पतीला दारुचं व्यसन लावणारा त्याचा भाऊच जबाबदार आहे या गोष्टीचा राग मनात धरुन महिलेने प्रियकरसोबत कट रचून 31 जानेवारीला दिराची गळा आवळून हत्या केली.
ADVERTISEMENT