कोरोना महामारीमुळे लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे अनेकांनी नैराश्याला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पुण्यातल्या लोणी काळभोरमध्ये घडलेली घटना मन सून्न करणारी आहे. हनुमंत शिंदे नावाच्या 38 वर्षांच्या तरूणाने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या मुलाचा सुरीने गळा चिरून खून केला. या दोन्ही हत्या केल्यानंतर हनुमंत शिंदेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
Lockdown मुळे पैशाची चणचण, पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे हा पत्नी आणि मुलासोबत राहत होता. तो एका गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. पण त्याला काही दिवसांपासून काम नव्हते. त्यामुळे तो तणावात होता आणि शांत रहात असायचा. याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले. यांना काही तरी सांगा म्हणून, पण त्याच दरम्यान 9 तारखेला सकाळच्या सुमारास हनुमंतने प्रज्ञाचा गळा दाबून आणि एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापून खून केला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पुण्यातील धक्कादायक घटना, आयसीयूमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
9 मेच्या सकाळी 11 ते साडेअकराच्या सुमारास तारखेला हनुमंत याने त्याची पत्नी प्रज्ञाची आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या केली. हनुमंतच्या पत्नीचं नाव प्रज्ञा आणि मुलाचं नाव शिवतेज आहे. हनुमंतने पत्नी प्रज्ञाचा गळा दाबून त्याने तिला संपवलं. त्यानंतर शिवतेजचा गळा सुरीने चिरला, त्यानंतर गळफास घेतला आणि आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. पुण्यात झालेल्या या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. बेरोजगारीला कंटाळून या तरूणाने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT