ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका क्षुल्लक वादातून 29 वर्षीय तरुणाची जमावाने हत्या केली आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना टेबलला धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून या तरुणाला जमावाने मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
सिद्धांत सरोज असं या मृत तरुणाचं नाव आहे. बदलापूर पश्चिमेकडील नाईन सिज नावाच्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान सिद्धांत सरोज आपल्या मित्रासोबत या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आला होता. यावेळी समोरच्या टेबलवर बसलेल्या एकाचा सिद्धांतच्या टेबलला धक्का लागला.
टेबलला धक्का का मारला? यावरुन सुरु झालेला वाद नंतर विकोपाला गेला आणि समोरील जमावाने सिद्धांतला मारहाण करायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिद्धांत रेस्टॉरंटच्या बाहेर पडताच पाच-सहा जणांनी लाठ्या-काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सिद्धांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
कारला धडकून लक्झरी बस उलटली, हॉटेलमध्ये बस घुसल्याने २५ जण जखमी
ADVERTISEMENT