एकीकडे संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत होत असताना वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉईल अंड्याचे १० रुपये देण्यावरुन झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला आहे. देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायगाव मध्ये संध्याकाळी तीन जणांनी उकडलेली अंडी विकत घेतली. यावेळी अंड्याच्या गाडीचा मालक गणेश आणि आरोपी करणसिंग याचा त्याच्या दोन साथीदारांसह वाद सुरु झाला. हा वाद सुरु असतानाच शेजारी असलेल्या पानटपरीवरील एक महिला त्यांना समजवण्यासाठी पुढे आली.
परंतू आरोपींनी समजवण्यासाठी आलेल्या बाईलाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. आपल्या आईला शिवीगाळ होत असल्याचं पाहताच त्याठिकाणी मुलचा चेतन घोडमारे हा मध्यस्थीसाठी पुढे आला. यावेळी संतापलेल्या आरोपींनी चाकूने वार करत चेतनला गंभीर जखमी केली. यानंतर चेतनला हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला.
देवळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी करणसिंग याला ताब्यात घेतलं असून त्याचे दोन साथीदार बबलुसिंग आणि सिरबंदसिंग फरार आहेत, या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
कायद्याची थट्टा! पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्यांनी आणि पोलिसाच्या पट्ट्याने बेदम मारहाण
ADVERTISEMENT