Manoj Jarange : मराठा-ओबीसी आंदोलक आमने सामने, वडीगोद्रीत काय घडलं?

मुंबई तक

21 Sep 2024 (अपडेटेड: 21 Sep 2024, 07:28 PM)

Manoj Jarange vs Laxman Hake : वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आलेत. वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु असून त्याच मार्गावरून मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाकडे जाणारा रस्ता आहे. या मार्गावर मराठा आणि ओबीसी आंदोलन आमने-सामने आलेत.

follow google news

Manoj Jarange vs Laxman Hake : जालना :  वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आलेत. वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु असून त्याच मार्गावरून मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाकडे जाणारा रस्ता आहे. या मार्गावर मराठा आणि ओबीसी आंदोलन आमने-सामने आलेत. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन यांच्यामधील संघर्ष टळला आहे. 

हे वाचलं का?

ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्यामुळे वडीगोद्री परिसरात सध्या तणावपूर्वक वातावरण निर्माण झालय. दरम्यान ओबीसी कमकुवत नाहीस ओबीसींच्या नादी लागण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं आवाहन ओबीसी आंदोलकांनी यावेळी केली आहे. 
 

    follow whatsapp