Jayant Patil: अजितदादांसोबत गेले अन् कार्यक्रमच, राष्ट्रवादीकडून 3 नेत्यांची हकालपट्टी!

रोहित गोळे

03 Jul 2023 (अपडेटेड: 03 Jul 2023, 03:13 PM)

अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांना आता पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. याबाबत जयंत पाटलांनी थेट कारवाई केली आहे.

ajit pawars swearing in ceremony dismissed from the party jayant patil actio

ajit pawars swearing in ceremony dismissed from the party jayant patil actio

follow google news

Maharashtra Politics News Marathi: मुंबई: अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यावेळी अजित पवारांना कोणतीही संधी न देण्याच्या तयारीनेच पक्षाकडून झटपट कारवाईला सुरुवात झाली आहे. याच रणनितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांना थेट बडतर्फ केलं आहे. (3 senior office bearers ncp attended ajit pawars swearing in ceremony dismissed from the party jayant patil action latest news in maharashtra politics)

हे वाचलं का?

अजित पवारांचा शपथविधी हा पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात होता. त्यामुळे त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला आहे. तसंच त्यांच्या शपथविधीला हजर राहून संबंधित नेत्यांनी देखील पक्ष शिस्त मोडली आहे. असं म्हणत आतापर्यंत तीन नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलं. ज्याचं पत्र देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. जाणून घ्या कोण आहेत हे तीन नेते..

शिवाजीराव गर्जेंना केलं पक्षातून बडतर्फ

‘महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.’ असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलं आहे.

विजय देशमुखांना केलं पक्षातून बडतर्फ

अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पक्षविरोधी काम केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजावलं आहे.

‘महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. विजय देशमुख उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.’

नरेंद्र राणेंनाही दाखवला पक्षातून बाहेरचा रस्ता

‘महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. नरेंद्र राणे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.’

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना पक्षातून थेट बडतर्फ करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

अजित पवारांच्या शपथविधीसाठी हजर असलेल्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तीन पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

    follow whatsapp