Rane vs Thackeray : राणे-ठाकरे गटात कशामुळे झाला राडा? राजकोट किल्ल्यावरील INSIDE स्टोरी, पाहा VIDEO

मुंबई तक

28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 03:48 PM)

Rane vs Thackeray Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. परंतु, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय घमासान सुरु आहे.

Thackeray vs Rane Video Viral

Thackeray vs Rane Video Viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलं

point

ठाकरे आणि राणे गटात राजकोट किल्ल्यावर झाला तुफान राडा

point

ठाकरे-राणे गटाचे कार्यकर्ते ऐकमेकांविरोधात का भिडले? पाहा व्हिडीओ

रितेश देसाई, सिंधुदुर्ग

हे वाचलं का?

Rane vs Thackeray Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. परंतु, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय घमासान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी दौरा केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी राजकोट किल्ल्यावर घटनास्थळी भेट दिली.

याचदरम्यान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या समर्थकांनीही राणेंच्या कार्यकर्त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानं हाणामारी झाली. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्याच्या परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे ठाकरे गटाचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले? 

काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते. त्यांची बुद्धी उंचीएव्हढीच आहे. त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांना विचारा, त्यांच्याकडून काय आदर्श ठेवायचा?  माझ्या महाराष्ट्राला लुटत चालले आहेत. वेदांत फॉक्सकॉनसारखे प्रकल्प गुजराला नेत आहेत आणि इथे येऊन लढाई करतात, ही भाजप आहे का? वाजपेयी साहेबांची भाजप वेगळी होती. ही भाजप भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. 

हे ही वाचा >> Sanjay Raut: 'फडणवीसांनी केसरकरांना जोड्याने मारलं पाहिजे'; महाराजांवरील वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक! 

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं होतं.  शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 2.36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर नौदलाकडून या संदर्भात निरीक्षण करण्यात आलं. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि परवानग्यांसाठी राज्य सरकारने नौदलाला सहकार्य केलं. सिंधुदुर्ग हे पर्यटन स्थळ असून ते राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. या पर्यटनस्थळाची देखभाल करण्याचं काम स्थानिक संस्थांना देण्यात आलं होतं, अशी माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली होती.

हे ही वाचा >> Sanjay Raut: '...तर राणे आणि त्यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते', राऊतांची राणेंवर बोचरी टीका


 

 

    follow whatsapp