Anand Dighe Death: 'आनंद दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं..', संजय शिरसाठांनी उडवून दिली खळबळ

मुंबई तक

28 Sep 2024 (अपडेटेड: 28 Sep 2024, 07:42 PM)

Sanjay Shirsat on Anand Dighe: आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

'आनंद दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं..'

'आनंद दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं..'

follow google news

बातम्या हायलाइट

point

'आनंद दिघेंचा घात झाला', संजय शिरसाठांचा खळबळजनक आरोप

point

धर्मवीर-2 नंतर संजय शिरसाठांच्या आरोपाने नव्या वादाला फुटलं तोंड

point

आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिरसाठांनी व्यक्त केला संशय

Anand Dighe Kill: मुंबई: धर्मवीर-2 हा सिनेमा काल (27 सप्टेंबर) प्रदर्शित झाला आणि आजच महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाठ यांनी आनंद दिघे यांना मारण्यात आलं असं धक्कादायक विधान केलं आहे. पण त्यांच्या याच विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. (after dharmaveer 2 shiv sena shinde group mla sanjay shirasat serious allegations said anand dighe was ambushed he was killed new controversy begins)

हे वाचलं का?

'आनंद दिघेंना मारलं, त्यांचा घात झाला...', शिरसाठ नेमकं काय-काय म्हणाले?

'मी दिघे साहेबांच्या अपघातापासून सगळं पाहिलं आहे. ते अनुभवलंय आणि तिथे गेलेलो देखील आहे. दिघे साहेबांना जे आजपर्यंत मी जवळून पाहिलंय..' 

'अपघातनंतर जी परिस्थिती होती ती म्हणजे.. दिघे साहेबांच्या डोक्याला मार लागला होता का? नाही.. दिघे साहेब अस्वस्थ होते का? नाही... सर्व झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची वेळ आली होती त्याचवेळेस त्यांना अचानक अटॅक आल्याचं का दाखवलं जातं? म्हणून आजही ठाणेकरांमधील जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत ते आजही म्हणतात की, दिघे साहेबांचा घात झालाय, दिघे साहेबाला मारलं गेलं.'

हे ही वाचा>> Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?

'आता संजय राऊतसारखं मी साक्षीदारच होतो हे म्हणण्याचं माझं धारिष्ठ नाही.. परंतु वेगवेगळे लोकं स्टोरी सांगतात की, त्यांना कोणतं तरी इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर रक्ताचा फुगा हृदयात तयार होतो त्यामुळे त्यांना अटॅक आला..' 

'यामुळे हृदयावर जो काही परिणाम होतो.. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्याची चौकशी त्या काळातच झाली पाहिजे होती. पण आजही मला वाटतं एकदा तरी उघड झालं पाहिजे.' 

'कोणी केलं असेल आणि का केलं असेल याची चौकशी झाली पाहिजे होते. आज आम्ही कोणावरही आरोप केले तर माझ्याकडे तसे पुरावे आहेत का? नाहीत.. मी कोणावर थेट आरोप नाही लावू शकत. परंतु जर याच्या खोलात गेलं तर त्याचे असलेले साक्षीदार कधी तरी बाहेर येतील. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे.'

हे ही वाचा>> Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला

'मी निवडणुकीच्या तोंडावर बोलत नाहीए. धर्मवीर-1 आला होता त्या दिवशी पण बोललो होतो. आताही बोलतोय आणि भविष्यातही बोलेन.' 

'आता वस्तुस्थिती यांना काय माहिती? तसा सीन मुळात आहे. आनंद दिघेंना मारलं गेलं हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय.' असे अत्यंत गंभीर आरोप संजय शिरसाठ यांनी केलं आहे.

    follow whatsapp