AJit Pawar : निवडणूक आयोगाने बहुमत आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress party) पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निर्णयावरून अजित पवारांवर शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, राष्ट्रवादी पक्ष पळवण्याची कामं आम्ही करत नाही. तर आम्ही विकासाची कामं करत असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला आणि त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देण्याशी बांधिल नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
मी उत्तर देत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेलाही अजित पवारांनी पत्रकार परिषदेतून जोरदार पलटवार केला आहे. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना म्हणाले की, 'ध'चा 'मा' करणाऱ्यांना मी उत्तर देत नाही म्हणत आव्हाडांनी त्यांनी फटकारले आहे.
हे ही वाचा >> NCP: शरद पवारांना मोठा राजकीय धक्का! पक्ष अजितदादांकडेच
बहुमताच्या आधारावर निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी कट रचत होते असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही पक्ष आणि चिन्ह पळवले नाही तर बहुमताच्या आधारावर आम्ही हा निर्णय घेतला होता, त्यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिल्याचे त्यांनी सांगितले.
बहुमत आणि प्रतिज्ञापत्र
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसविषयी दिलेला निर्णय हा आम्ही विनम्रपणे स्वीकारतो आहे. हा निर्णय दिला असला तरी आम्ही कोणत्याही प्रकारे उतमात करणार नाही. मात्र जो निर्णय दिला आहे तो बहुमत आणि प्रतिज्ञापत्रावर दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासाचे राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेसविषयी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कायद्यानुसार दिला आहे. त्यामुळे आता आम्ही विकासाचे राजकारण करणार आहे. त्याच बरोबर आमच्यासोबत जे येतील त्यांचे स्वागत करू व बेरजेचे राजकारण करु असा सूचित इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी आम्ही फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचाराने व यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पुढं जाण्याचा निर्णय घेऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT