Ram Satpute : "2029 ला गुलाल लागला नाही, तर मी..." राम सातपुते इरेला पेटले, पडळकर सदाभाऊंसमोर काय म्हणाले?

सुधीर काकडे

• 03:52 PM • 10 Dec 2024

मोहितेंच्या गुंडांकडून ग्रामस्थांना धमकावलं जात असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला होता. आज त्याच मारकडवाडीमध्ये भाजपने सभा घेतली आणि शरद पवार यांना उत्तर दिलं. मोहितेंची गुलामी या गावाला कधीच मान्य नाही असं म्हटलं. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राम सातपुते उत्तम जानकर, मोहिते, पवारांवर बरसले

point

मारकडवाडीमध्ये सभा घेत विरोधकांना दिला इशारा

Ram Satpute Markadwadi : मारकडवाडीमध्ये आज भाजपची सभा पार पडली. या सभेला उपस्थित राम सातपुते, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.  काही दिवसांपूर्वी या गावातील ग्रामस्थांकडून EVM ला विरोध करत बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रयत्नांना प्रशासनाने रोखलं. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. शरद पवार यांनी या गावात भेट देऊन या ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं असून, भाजपने मात्र शरद पवार फेक नरेटीव्ह निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. तसंच मोहितेंच्या गुंडांकडून ग्रामस्थांना धमकावलं जात असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला होता. आज त्याच मारकडवाडीमध्ये भाजपने सभा घेतली आणि शरद पवार यांना उत्तर दिलं. मोहितेंची गुलामी या गावाला कधीच मान्य नाही असं म्हटलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>  Dharma Mane Markadwadi : धर्मा माने मारकडवाडीमध्ये, राम सातपुते यांच्याबद्दल काय म्हणाले?

मोहिते आणि जानकरांच्या चार टकुऱ्यांनी काही म्हटलं म्हणजे गावाची मागणी होत नाही असं म्हणत राम सातपुते यांनी विरोधकांना उत्तर दिलं. रणजितसिंह मोहिते हे डबल ढोलकी आहे असं म्हणत राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीतले काही किस्से सांगितले. मारकडवाडीचा DNA भाजपविरोधातला आहे, इथं विकासकामं केली, पण मोहिते पाटलांनी वाटोळं केलंय असं राम सातपुते म्हणाले. तसंच ते पुढे म्हणाले की, 2029 ला माळशिरस मतदारसंघाचा आमदार भाजपचा असेल. अकलूजच्या घराघरात, गल्ली-गल्लीत जाईल, काम करेल, पण 2029 ला गुलाल आला नाही तर मी राजकारणातून थांबून जाईल असं राम सातपुते म्हणाले. 

हे ही वाचा >> Gopichand Padalkar : "100 शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला...", पडळकर, सदाभाऊ खोत पेटले, एकेरी शब्दात बोलले

रणजितसिंह मोहिते, धैर्यशील मोहिते, उत्तम जानकर हे सगळे बसले आणि यांनी ठरवलं की राम सातपुतेंच्या मागे लोक नाही असं दाखवायचं. मग एक गाव निवडलं, नाटक रचलं. त्यामुळे या मारकडवाडीचा मास्टर माईंड रणजितसिंह मोहिते आहेत असा आरोप आरोप राम सातपुते यांनी केला. मोहितेंच्या खोट्या नरेटीव्हला उत्तर म्हणून ही सभा आहे असं राम सातपुते म्हणाले आहेत. 


 

    follow whatsapp