बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावल्याने त्याचे समर्थक आणि कुटुंबीय हे आक्रमक झाले आहेत. मागील अनेक तासांपासून त्यांनी परळी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्यातच वाल्मिक कराडच्या पत्नीने थेट SIT प्रमुखांवरच गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय मागील महिनाभर आपण मरणयातना भोगत आहोत असं म्हणत त्यांनी या प्रकरणी उद्या चक्का जामची घोषणा दिली आहे. (after mcoca imposed on walmik karad his wife expressed anger saying we have been suffering death pain for a month)
ADVERTISEMENT
पाहा वाल्मिक कराडची पत्नी नेमकं काय म्हणाली
'आज आम्हाला मुख्यमंत्री किंवा बीडच्या एसपी साहेबांनी इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला शब्द द्यावा. एसआयटीमध्ये बसवराज तेलींना ठेवूच नये. त्यांच्या जागी दुसरा अधिकारी आणावा. आम्हाला हा तपास अधिकारी नकोच.'
हे ही वाचा>> Walmik Karad: 'माझ्या छातीत दुखतंय...', मकोका लागताच वाल्मिक कराडच्या छातीत आली कळ
'तुम्हाला सीडीआर काढायची फार हौस आहे ना मोबाइलचे.. तुम्ही तेलीचे आणि धसांचे काय संपर्क आहेत का त्याचे सीडीआर काढा. म्हणजे समजेल की, धसांचे किती फोन तेलींना गेले.. तुम्हाला त्यावरून समजेल की, इथे काय राजकारण सुरू आहे.'
'फक्त एक छोट समाज आहे आणि त्याला पुढे येऊ दिलं जात नाही. वंजारी समाज हा परळीपुरताच आहे. त्याला परळीमध्ये कसं दाबायचं, आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे. त्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून, नियोजन माझ्या नवऱ्याला यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे.'
'मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून माझ्या नवऱ्याबाबत जे काही चालू केलं आहे.. त्यांना संपवण्याचं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या नेत्यांना संपविण्याचं जे काही षडयंत्र चालू केलं आहे ते तात्काळ त्यांनी थांबवावं..'
हे ही वाचा>> Walmik Karad MCOCA Case: वाल्मिक कराडवर आजच कसा लागला मकोका? महिनाभर खुनाचा गुन्हाही नव्हता!
'विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला, गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण यांनी करू नये. अक्षरश: आज मरणयातना आम्ही महिना झाला.. आम्ही मरणयातना भोगतोय..'
'ज्या व्यक्तीचा खून झाला आणि माझ्या नवऱ्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. ओळख सुद्धा नाही किंवा फोन कॉल सुद्धा नाही. मग कोणत्या गोष्टीतून तुम्ही माझ्या नवऱ्याचा त्या व्यक्तीच्या हत्येशी संबंध जोडत आहात?'
'हत्येचा संबंध का जोडत आहात तर फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जातंय. सर्वात मोठं कारण म्हणजे सुरेश धस यांना आमच्या दोन नेत्यांना संपवायचं आहे. आमच्या समाजाला संपवायचं आहे. हे मुख्यमंत्र्यांनीही ओळखून घ्यावं. आता मी त्यांच्याशिवाय मी कोणाकडे दाद मागू शकत नाही.'
'आज खंडणीच्या गुन्ह्यातून जामीन मिळाला असता. पण 15 दिवस होते तेव्हा हत्या प्रकरणाची चौकशी का केली नाही?' असा सवाल मंजिरी कराड हिने माध्यमांशी बोलताना केला आहे.
ADVERTISEMENT
