पुणे: महाराष्ट्रात एकीकडे दिवाळीचा सण असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज (10 नोव्हेंबर) अचानक पुण्यातील बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. साधारण तासाभराच्या चर्चेनंतर अजित पवार हे अचानक दिल्लीसाठी रवाना झाले. अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं आता समोर येत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल हे देखील आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र, या सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही हे बऱ्याचदा समोर आलं आहे. त्यातही अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी हे उत्सुक असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. पण असं असतानाही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये काम करावं लागत आहे.
हे ही वाचा>> Lok Sahba 2024: “मविआला 31 ते 33, तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार”
हीच नाराजी अजित पवार यांनी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना डेंग्यूची लागण झालेली त्यामुळे ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. असं असतानाच आज अचानक ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळेच सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.
पुण्यात शरद पवार-अजित पवारांची भेट, अन्…
पुण्यात बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी आज शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांची भेट झाली. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा>> EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप
अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले जिथे ते अमित शाह यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, ‘सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो.’ दरम्यान, यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना अजित पवारांच्या भेटीबद्दल विचारलं, त्यावेळी पवार फक्त एवढंच म्हणाले की, ‘अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती.’ यावेळी पवारांना अजितदादांच्या दिल्ली भेटीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबाबत शरद पवार यांनी बोलणं टाळलं.
शरद पवार यांच्या भेटीनंतर अचानक अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT