ADVERTISEMENT
Ajit Pawar News: (कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सध्या पूर्ण लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे. ‘दादाचा वादा, लाभ आणि बळ‘ अशी प्रचाराची लाईनही ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधमुती यंदा अजित पवार वाढदिवस साजरा करणार असून, एका केकने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. (Ajit Pawar Celebrates Birthday with Party Workers)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी म्हणजेच २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. पण, वाढदिवसाच्या एकदिवस आधीच कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनसाठी आणलेल्या केकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
अजित पवारांनी कापला केक
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार रविवारी (२१ जुलै) पिंपरी चिंचवडमध्ये होते. या दौऱ्यात त्यांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खास केक तयार करण्यात आला होता.
हेही वाचा >> भाजपचा आकडा ठरला? पवार-शिंदे करावा लागणार मोठा त्याग!
या केकवर लिहिलेलं होतं की, ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की,...’
हा केक कापत अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. पण, केकवरील मजकुराने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला हवा दिली.
हेही वाचा >> सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या, पुण्यातल्या बैठकीवर काय म्हणाल्या?
भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले होते बॅनर्स
अजित पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद ही चर्चा कायमच होत राहिली आहे. अजित पवारांनीही ही इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावले गेले आहेत.
पुरेसे संख्याबळ हा कळीचा मुद्दा
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात कायम सत्तेत राहिली. २००४ वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदावर दावा करता यावा, इतकी संख्या मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडे आघाडीमध्ये कायम उपमुख्यमंत्रिपद आणि इतर काही महत्त्वाची खाती आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली, पण अपेक्षित असं मिळालं नाही.
ADVERTISEMENT