Gopichand Padalkar Markadwadi : मारकडवाडीमध्ये आज भाजपची सभा पार पडली. काही दिवसांपासून या गावात EVM ला विरोध करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत एक लढा उभा केला आहे. लोकांनी मॉक पोलची तयारी केली होती, मात्र प्रशासनाने त्याला विरोध करत ते रद्द करायला सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षांनी या गावातील प्रकरणाची दखल घेत हा मुद्दा लावून धरला होता. तर दुसरीकडे शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इथे भेट देऊन या ग्रामस्थांना पाठिंबा दिला हौता. त्यानंतर आता राम सातपुते यांनी या गावातील लोकांवर दादागिरी केली जात असून, फेक नरेटीव्ह निर्माण केल्या जातोय असा आरोप केला. याच संदर्भाने आज मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते यांनी या गावात सभा घेत शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मोहिते किरकोळ झाले, पूर्वीसारखं राहीलं नाही असंही पडळकर म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Kurla BEST Bus Accident : लेकीचा फोन आला, रिक्षा मिळत नाही म्हणाली अन् नंतर थेट मृतदेह... बापानं जड अंतकरणानं सांगितलं आपबीती
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं, 100 शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला आलाय. धनगर समाज हा लोकशाही मानत नाही, कायदा मानत नाही म्हणून मारकडवाडीला पुढं करण्यात आलंय. पण हिंदुस्तानातला धनगर समाज लोकशाहीला मानतो. पवारांचा डाव लाथांनी उधळून टाकण्यासाठी आम्ही इथं आलो. जयंत पाटील कपटी, नीच जातीवादी आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटलांना राजीनामा द्यायला सांगा. तुमचं माजलेलं बोकड आम्ही बिरोबाला कापतो ना, आमचा का बकरा बनवता? असा खोचक सवाल त्यांनी केला.
पडळकर पुढे म्हणाले, मोहिते, पवार हे सरंजामशाहीवाले, यांना वाटतं आम्हीच राजे आहोत. बाबासाहेब निवडणुकीला उभे होते तेव्हा 14 हजार मतांनी पराभव झाला. पण 74 हजार मतं त्यांनी बाद ठरवली होती. EVM हॅक होत असेल तर दाखवून द्या, एकही माणूस का पुढं येत नाही. मुख्यमंत्री होणार, म्हणून नव्या नवरीसारखे नटले होते 22 तारखेला असा टोलाही पडळकरांनी मारला. EVM हॅक करुन दाखवा, मी 50 रुपये, सदाभाऊ 51 रुपये देतील असं 101 रुपये आम्ही जयंत पाटलांना देऊ. शरद पवारांनी आमदार, खासदारांचं प्रशिक्षण द्यावं की निवडणुका कशा होतात. असं म्हणत पडळकरांनी पवारांवर आणि जयंत पाटलांवर सडकून टीकाकेली.
हे ही वाचा >> Dharma Mane Markadwadi : धर्मा माने मारकडवाडीमध्ये, राम सातपुते यांच्याबद्दल काय म्हणाले?
लाडकी बहीण, होमगार्ड, पोलीस पाटील, शेतकरी यांच्यासाठी फडणवीसांनी काम केलं, म्हणून त्यांनी ईव्हीएम हॅक केलं असं उत्तर गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना दिलं. केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांनी EVM मशिन हॅक केलं. पवार आतापर्यंत संस्था हॅक करत होते, पण मारकडवाडीतलं आंदोलन त्यांनी हायजॅक केल असं पडळकर म्हणाले.
ADVERTISEMENT