NCP: राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? 3O सप्टेंबरला फैसला,अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

ऋत्विक भालेकर

27 Aug 2023 (अपडेटेड: 27 Aug 2023, 05:56 PM)

प्रफुल पटेल बीडच्या सभेत बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाबाबत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय येणे अपेक्षित असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे.

ajit pawar group leader praful patel big revelation about election commision decision whose ncp

ajit pawar group leader praful patel big revelation about election commision decision whose ncp

follow google news

अजित पवारांनी बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी फुटली होती. या फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाची? हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. निवडणूक आयोगाने (Election commision) यावर दोन्ही गटाकडून उत्तरही मागवली होती. त्यात आता यावर निर्णय कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी पक्षाबाबत अजित पवार गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठा खुलासा केला आहे. (ajit pawar group leader praful patel big revelation about election commision decision whose ncp)

हे वाचलं का?

प्रफुल पटेल (Praful Patel) बीडच्या सभेत बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाबाबत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय येणे अपेक्षित असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकांच्या मनात शंका, राष्ट्रवादी पक्ष हा खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे.मी तुम्हाला आवर्जुन सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे.आणि आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अनके लोक वेगवेगळी भूमिका मांडतायत. पण पक्षाने तांत्रिक बाबतीत आणि सगळ्या बाबतीत विचार करून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अजितदादांना समर्थन द्यावे, असे आवाहन प्रफुल पटेल यांनी बीडच्या जनतेला केले आहे.

भुजबळाचे वाद मिटवण्याचे आवाहन

राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? पक्ष कुणाकडे आहे? असा भाषणाचा सुरुवातीलाच सवाल करत छगन भुजबळ म्हणाले, हा सगळा महासागर पाहून स्पष्ट होते की, हा राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा आहे आणि अध्यक्ष अजित दादाच आहे, असे विधान करून छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, शरद पवार माझा मतदारसंघ येवला ते बीड ते कोल्हापूर अशी रॅली काढतात, मात्र बारामतीला पोहोचल्यावर यू-टर्न घेतात.आणि अजित पवार अजूनही आमचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणणार, शरद पवार म्हणणार तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा, आशीर्वाद देऊन वाद मिटवा असे आावहन छगन भुजबळ यांनी केले होते.

    follow whatsapp