”मी अजित अनंतराव पवार” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 10:06 AM)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला दोन उप मुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

ajit pawar has taken oath as deputy chief minister and ncp 9 mla take oath on maharashtra government governor ramesh bais

ajit pawar has taken oath as deputy chief minister and ncp 9 mla take oath on maharashtra government governor ramesh bais

follow google news

Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.  त्यामुळे आता अजित पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला दोन उप मुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 नेते मंत्री पदाची शपथ घेतली आहे.दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान हे राष्ट्रवादीचे हे 9 मंत्री कोणते असणार आहेत, हे जाणून घेऊयात. (ajit pawar and ncp 9 mla take oath on maharashtra government governor ramesh bais)

हे वाचलं का?

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांत प्रथम उप मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले. यानंतर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. छगन भुजबळ यांच्यनंतर दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  वळसे पाटील यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांना राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतत धर्मरावबाबा अत्राम यांना राज्यपालांनी शपथ दिली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  आदिती तटकरे यांच्यानंतर संजय बनसोडे, अनिल बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या सर्व मंत्र्याच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दरबार हॉल घोषणांनी दणाणून सोडला होता.

दरम्यान या 9 मंत्र्यांमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाईच्या ससेमिरा लावण्यात आला होता. त्यामुळे या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

    follow whatsapp