अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 10:13 AM)

अजित पवारांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं.

chief minister of maharashtra eknath shinde reaction after ajit pawar took oath as deputy chief minsiter

chief minister of maharashtra eknath shinde reaction after ajit pawar took oath as deputy chief minsiter

follow google news

Eknath shinde Reaction on ajit pawar swearing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ताकद आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पक्षातील आमदारांच्या साथीने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. वाचा काय म्हणाले एकनाथ शिंदे…?

हे वाचलं का?

राजभवनात शपथविधी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, “राज्यामध्ये आज अजित पवार आणि त्यांचे सहकारी आमदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला पाठिंबा दिला आहे.”

वाचा >> “आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्राला…”, अजित पवारांच्या शपथविधीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

“डबल इंजिन सरकार आहे, त्याला आणखी एक इंजिन जोडलं गेलं आहे. त्यामुळे आता राज्याचा विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. या महाराष्ट्रातील जनतेला विकासाचा फायदा मिळेल. राज्यातील जनतेला विकासाचा फायदा मिळेल. मंत्रिमंडळ विस्तार आता तातडीने होईल”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

वाचा >> “मी अजित अनंतराव पवार” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

“आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. आता सरकार वेगाने धावेल. मी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. त्यांच्या अनुभवांचा सरकारला आणि जनतेला फायदा होईल. राज्यामध्ये जो विकास सुरू आहे, त्या विकासाला अजित पवारांनी साथ दिलेली आहे”, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

    follow whatsapp