Maharashtra Politics: अजित पवारांचा शपथविधी अन् आदित्य ठाकरे म्हणाले, तुमच्या गद्दारीमागे फक्त…!

मुंबई तक

• 01:25 PM • 02 Jul 2023

अजित पवारांच्या शपथविधी नंतर शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरुन ही टीका केली आहे.

After Ajit Pawar's swearing-in, Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has criticized the Shinde faction in a tweet. He has criticized this on Twitter.

After Ajit Pawar's swearing-in, Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has criticized the Shinde faction in a tweet. He has criticized this on Twitter.

follow google news

Maharashtra Politics News Marathi: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (2 जुलै) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. अजित पवारांनी जी राजकीय खेळी केली आहे त्याबद्दल आता त्यांच्यावर जोरदार टीका देखील होत आहे. असं असताना दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आजच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 40 बंडखोर आमदारांवर तुफान टीका केली आहे. (ajit pawar swearing in shiv sena ubt aaditya thackeray criticized shinde group tweet twitter ncp bjp shiv sena maharashtra politics news latest)

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करताना असं म्हटलं की, ‘जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?’

‘एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?’ असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत…’, अजितदादांकडून ‘त्या’ कृतीचं समर्थन

आदित्य ठाकरेंची कठोर शब्दात शिंदे गटावर टीका, ‘ते’ ट्विट जसंच्या तसं:

आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –

मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?

रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?

एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?

आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना…

एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!

‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!

हे ही वाचा >> विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, ”पवार साहेबांनी आधीच…”

असं बोचऱ्या शब्दात आदित्य ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. आता आदित्य ठाकरेंच्या या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp