मुंबई: भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. ज्यानंतर आता विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांचे असे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीने केला आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
‘त्या’ Video वरुन विरोधकांचा सोमय्यांसह भाजपवर तुफान टीका
साधनशुचेतीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी- अंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते)
‘खरं तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे अनेक प्रकरणात त्यांनी ईडीकडे वेगवेगळ्या लोकांच्या तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असंही आम्ही ऐकतो. साधनशुचेतीच्या गप्पा मारणाऱ्या नेत्याचा हा व्हीडिओ आता समोर येतोय. आता वकील साहेब म्हटले असतील की, तो… ज्याचा त्याचा खासगी विषय आहे. परंतु मला वाटतं की, त्यांना नैतिकता, परंपरा.. हे विषय आहे की नाही?’
‘असं असताना जी भाजप देशाची संस्कृती, हिंदुत्वाची संस्कृती.. यावर मोठमोठी भाषणं करतं, मोठ्यामोठ्या गप्पा मारतात. त्याच पक्षाचा एक नेता.. त्याचे असे व्हीडिओ समोर येतोय. मला वाटतं दुर्दैवी आहे.’
‘याशिवाय या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या. आता याबाबत गृहमंत्रालयाने याविषयी चौकशी केली पाहिजे. आता सगळ्या विषयात साधनशुचेतीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे..’
‘असं ऐकतो आहे की, त्यांच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रार केले आहेत. माझे पंतप्रधान, गृहमंत्री ईडी यांच्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. ते सगळे माझ्या तालावर नाचतात.. म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारीसुद्धा काही ठिकाणी आल्या आहेत.. असं माझ्या कानावर आलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
‘किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही मराठी चॅनेल दाखवत आहे. माझ्याकडे किरीट सोमय्या यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे.’ असं ट्वीटही दानवेंनी याबाबत केलं आहे.
किळसवाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे – यशोमती ठाकूर
‘भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चॅट सर्वांसमोर आणल्याबद्दल वृत्तवाहिनीचे आभार. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं सर्वांसमोर आला आहे. आता या चॅनेलच्या पाठिशी राहणं ही लोकशाही मानणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे. नाहीतर या चॅनेलवरही ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या धाडी पाडल्या जातील किंवा मागच्या दारातून हे चॅनेलही विकत घेतलं जाईलही.’
‘मात्र, कोंबडं झाकून ठेवलं तरी आरवायचं राहत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला गेला तरी भाजपमधले ‘किळस’वाणे सोमय्या बाहेर येतच राहणार…’
‘नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली आहे.’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT