Amol Kolhe Ajit Pawar News : ‘शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार. तुम्ही काळजीच करू नका. त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडूनच आणणार”, असं सांगत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंविरुद्ध दंड थोपटले. त्यामुळे कोल्हे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अजित पवारांच्या आव्हानानंतर कोल्हेंनी शरद पवारांची मंगळवारी (26 डिसेंबर) पुण्यात भेट घेतली. या भेटीत शिरुरबद्दल काय चर्चा झाली आणि अजित पवारांच्या विधानावर कोल्हे काय म्हणाले, हेच जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांनी त्यांना अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले. अजित पवारांकडून सातत्याने टीका होतेय, त्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा केलीये का? या प्रश्नाला उत्तर देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” यासंदर्भात मी काल विधान केलेलं आहे. अजित पवार हे मोठे नेते आहेत. आता ते जी काही टीका करत आहेत… मी आहे तिथेच आहे. ते जी टीका करताहेत, यासंदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता. तेव्हाच त्यांनी धरला असता, तर सोप्पं झालं असतं.”
हेही वाचा >> “…मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही”, प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’ला इशारा
अजित पवारांचा मी आभारी -अमोल कोल्हे
तुमच्या मतदारसंघात जाऊन अजित पवारांनी पाहणी केली, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोल्हे यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, “मी त्यांचा आभारी आहे. दहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची पाहणी करून झाली आहे. त्यानंतर अजित पवारांना हा उड्डाणपूल लवकर खुला करण्याची विनंती केली होती.”
हेही वाचा >> अजित पवारांना लोकसभा निवडणुकीआधीच पिंपरी चिंचवडमध्ये धक्का, विश्वासू नेता ठाकरेंच्या शिवसेनेत
अजित पवारांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं का? या प्रश्नावर अमोल कोल्हे हसले आणि म्हणाले, “मी सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं, हा मी माझा गौरवच समजेना ना? अजित पवार आमचे नेते होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही. त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून आदर आहे. तो तसाच राहील. राजकीय भूमिका म्हणून त्यांचं काही विधान असेल, तर भेटून त्यांच्याकडून समजून घेईन”, अशी भूमिका अमोल कोल्हेंनी मांडली.
कोल्हेंना शरद पवारांनी कोणती गोष्ट सांगितली?
“मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय की, 2019 ला मी ज्या ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी मी 2023 ला आहे. आता भूमिका ज्यांनी बदललीये, त्यांनी ती भूमिका का बदलली असेल, हे मला सांगता येत नाही. कारण मी खूप लहान कार्यकर्ता आहे. लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपुर अधिकार आहे. पण, निर्णय मायबाप जनता घेणार आहे. शरद पवारांनी हीच गोष्ट सांगितली की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाही असल्यामुळे समोर उमेदवार असणारच”, असे कोल्हेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितलं.
ADVERTISEMENT