देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

मुंबई : भाजप प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची (Devendra Fadnavis Office) एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

27 Sep 2024 (अपडेटेड: 27 Sep 2024, 06:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड

point

अज्ञात महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकली

point

मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

मुंबई : भाजप प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची (Devendra Fadnavis Office) एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी 26 सप्टेंबर 2024 रोजी हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. यावेळी अज्ञात महिलेने मंत्रालयात घुसून राडा केला. सचिवांसाठी असलेल्या गेटमधून तिने मंत्रालयात घुसखोरी केली आणि नंतर फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

हे वाचलं का?

अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात आरडाओरडा केला. तसंच तिथे असलेल्या कुंड्याही तिने फेकून फोडल्या आणि नंतर तिथून पसार झाली.

हेही वाचा : Riya Barde: उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार रिया बर्डे कोण? 

मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

ही महिला कोण होती हे अद्याप समजू शकलेले नाही आहे. मरिनड्राईव्ह पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. त्यामुळे आता तपासातून कोणती माहिती हाती लागणार, हे पाहावे लागेल. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

हेही वाचा : महालक्ष्मी हत्याकांडात नवा ट्विस्ट! 59 तुकडे करणाऱ्या आरोपीने घेतला गळफास, सुसाइड नोटमध्ये नेमकं काय? 

तसेच, आता या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नाही, अशी टीका केली जात आहे.

    follow whatsapp