Samit Kadam : फडणवीस-देशमुख वादातील समित कदम कोण?

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 02:48 PM)

Who is Samit Kadam : देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचे तत्कालीन सरकार पाडण्यासाठी समित कदम यांच्यामार्फत दबाव टाकल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. या आरोपानंतर समित कदम नेमके कोण आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

anil deshmukh vs devendra fadnavis political controversy who is samit kadam maharashtra politics

समित कदम कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

follow google news

बातम्या हायलाइट

point

समित कदम आता जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

point

समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

point

सरकारने समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती.

Who is Samit Kadam : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर महाविकास आघाडीचे तत्कालीन सरकार पाडण्यासाठी समित कदम यांच्यामार्फत दबाव टाकल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर समित कदम नेमके कोण आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे समित कदम (Samit kadam) कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (anil deshmukh vs devendra fadnavis political controversy who is samit kadam maharashtra politics) 

हे वाचलं का?

कोण आहेत समित कदम? 

  • समित कदम हे मुळेच मिरजचे आहेत. 
  • जनसुराज्य युवा शक्तीमध्ये ते 2008 पासून काम करत आहेत. 
  • समित कदम आता जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 
  • समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 
  • समित कदम यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही आहे. 
  • आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते इच्छुक असल्याची माहिती आहे. मिरजमध्ये तशी बॅनरबाजीही झाली होती. 
  • समित कदम हे मिरजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. दहीहंडी उत्सव यांसारखे कार्यक्रम ते आयोजित करतात. 
  • सरकारने समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. 
  • आगामी काळात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अनिल देशमुखांचा आरोप काय? 

 उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधात आरोप करणारे अॅफिडेव्हिट द्यावे असा निरोप फडणवीसांनी दिला होता असं देशमुखांनी सांगितलं.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचे नाव समित कदम असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली होती.

हे ही वाचा : Yashashree Shinde : केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप

 समित कदम आपल्याकडे यासंदर्भात पाच ते सहा वेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप काय करायचे त्याचा लिफाफा समितने दिल्याचं देशमुखांनी सांगितलं. समितसोबतच्या संवादाची व्हिडीओ क्लिपसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला. पण 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं आपण समित कदमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना कळवलं आणि नेत्यांविरोधात आरोप करणार नसल्याचं सांगितलं असं देशमुख म्हणाले. 

समित कदमांचं वादावर पहिल्यांदाच भाष्य  

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस आरोप प्रत्यारोपात समित कदम यांनी समोर येऊन मोठा खुलासा केला आहे. ''मी स्वत:हून अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो, तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही'',असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपावर बोलताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा अशी विनंती अनिल देशमुखांना केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यावर आपण त्यांची भेट घेतली होती. 

    follow whatsapp