Beed: हवेत गोळीबार करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम, सरकारची मोठी कारवाई

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह बीडमधील एकूण 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

शस्त्र परवानाबाबत सरकारची मोठी कारवाई

शस्त्र परवानाबाबत सरकारची मोठी कारवाई

मुंबई तक

07 Jan 2025 (अपडेटेड: 07 Jan 2025, 01:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांच्यावर दाखल आहे गुन्हा

point

बीड जिल्ह्यातील 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द

point

उर्वरित अर्जाची पडताळणी सुरु, आतापर्यंत 303 परवाने केले रद्द

योगेश काशिद, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेत आला होता. त्यातच हवेत गोळीबार केल्याचे काही व्हिडीओही समोर आले होते. त्याच प्रकरणी काही जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आलं आहे. पण आता शासनाने शस्त्र परवानाविषयी जोरदार कारवाई केली आहे. हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या तब्बल 74 जणांचे शस्त्र परवाना रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.

हे वाचलं का?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने पिस्तुलसह फोटो, व्हिडीओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> 'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली', सुरेश धसांनी उडवून दिली खळबळ

तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील 71 जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. 

आतापर्यंत 303 परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

हे ही वाचा>> धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार आणि CM फडणवीसांची ‘सागर’वर खलबतं

शस्त्र परवाना रद्द कधी होतो? 

एखाद्या व्यक्तीकडे परवाना आहे पण त्याने बंदुकीचा गैरवापर केला, तर त्या व्यक्तीचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने त्या बंदुकीचा वापर करुन गुन्हेगारी कृत्य केलं तर त्याचा देखील परवाना रद्द केला जाऊ शकतो. एका विशिष्ट काळासाठी हा परवाना दिलेला असतो. अधिकारी या परवान्यांची पडताळणी करुन एखाद्या व्यक्तीला परवान्याची आता गरज नाही असं वाटल्यास, त्या व्यक्तीला नोटीस पाठवून योग्य उत्तर न आल्यास परवाना रद्द केला जाऊ शकतो. 

परवाना मिळाला, तर त्याला ती बंदुक हवी तशी वापरता येत नाही. योग्य कारणाशिवाय कोणालाही त्या बंदुकीचा वापर करता येत नाही. 

एकूणच ही सर्व प्रक्रिया पाहता बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने का देण्यात आले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अंजली दमानिया यांनी याविरोधात आवाज उठवल्याने अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

    follow whatsapp