Maharashtra Politics Latest News: विक्रांत चौहान, ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT)पक्षाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काल (16 जून) ठाणेनजीक कळव्यात एका कार्यक्रमात अचानक काही स्थानिक महिलांनी हल्ला चढवत त्यांना मारहाण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात आधी हार नाही घातला त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला आहे. असं म्हणत काही महिलांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. (ayodhya poul thane kalwa beaten shinde group thackeray group pelted with ink incident)
ADVERTISEMENT
आता या संपूर्ण घटनेनंतर राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. मात्र, हे सगळं प्रकरण नेमकं कसं घडलं आणि त्यावेळी काय घडलं याबाबत स्वत: अयोध्या पौळ यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. पाहा अयोध्या पोळ नेमकं काय म्हणाल्या.
कळव्यातील ‘ती’ घटना जशीच्या तशी
‘150-200 महिलांना ट्रॅप करावं लागलं ही शाईफेक करण्यासाठी. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता असं मला सांगण्यात आलं होतं. या कार्यक्रमला राजन विचारे, सुषमा अंधारे, केदार दिघे आणि माझं नाव टाकून पोस्टर तयार करण्यात आले होते. तसेच मला सातत्याने संपर्क केला जात होता. आतापर्यंत मी संपर्कप्रमुखांसोबत अनेक सभा आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झालीए. त्यामुळे यावेळी देखील मी काही तपासून पाहिलं नाही की, हे लोकं येणार आहेत की नाही. त्यामुळे मी नेहमी प्रमाणे कार्यक्रमाला जाते तशीच या कार्यक्रमाला देखील आले.’
‘कार्यक्रम ठिकाणी फक्त मी आणि सुषमा अंधारे यांचा फोटो होता. त्यामुळे मी कार्यक्रमस्थळी पोहचल्यावर म्हटलं की, सुषमाताई माझ्या सीनियर आहेत. त्या अजून आलेल्या नाहीत. तर मी राजन विचारे आणि केदार दिघे यांच्याबाबत देखील विचारलं. तर मला सांगितलं की, त्यांची तब्येत बरी नाहीए. त्यामुळे मला संशय आला. म्हणून मी लागलीच सुषमाताईंना मेसेज केला की तुम्ही कधी पोहचताय?’
‘सुषमाताई ऑनलाइन होत्या पण त्यांनी रिप्लाय केला नाही. म्हणून मी त्यांना कॉल केला. मी त्यांना बॅनरही पाठवला. तर त्या म्हणाल्या की, मला अशा काही कार्यक्रमाबाबत माहितीच नाही. फोन ठेवल्यानंतर मला तेथील महिलांनी सांगितलं की, कार्यक्रम सुरू करूयात.’
‘त्यावेळी मी त्यांना म्हटलंही.. तुम्ही खोटं नव्हतं बोलायचं ना.. तर त्या म्हणे.. झालं ते झालं आपण कार्यक्रम सुरू करू. आता महापुरूषांचा कार्यक्रम म्हणून मी हार घातला. सगळ्यात आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घातला. त्यानंतर मी बाकीच्या ज्या महिला होत्या ज्यांनी मला कार्यक्रमाला बोलावलं होतं. त्यांना म्हटलं की, तुम्ही या आणि हार घाला.’
‘तर त्यातील एक महिला म्हणाली की, तुम्हीच हार घाला. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती कार्यक्रमाला आलेली असल्याने मी त्यांच्या प्रतिमेला हार घातला. म्हणजे मी हार घालेपर्यंत त्यांनी काहीच आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर मी तिसरा हार उचलला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस घातला.’
हे ही वाचा >> Ayodhya Poul: ठाण्यात मारहाण, शाईफेक.. ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ म्हणाल्या; ‘हा तर ट्रॅप…’
‘हार घातल्यानंतर एक महिला माझ्या जवळ आली आणि तिने मला धक्का देऊन म्हटलं की, तुम्ही आमच्या महामानवाचा अपमान केला. तुम्ही सगळ्यांच्या आधी त्यांना हार घालायला पाहिजे होता..’
‘मी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे त्यांना हार घातला. त्यानंतर ज्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांच्या प्रतिमेस हार घातला. नंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घातला.. तर त्यांचा अपमान कसा झाला?’
‘मी असं बोलेपर्यंत एक दुसरी महिला आली आणि तिने माझ्यावर शाईफेक केली. त्यावेळी समोर अनेक महिला उभ्या होत्या.. म्हणजे हा संपूर्ण ट्रॅप होता. त्यानंतर इतर दोन महिलांनी जोरात माझे केस खेचण्यास सुरुवात केली. मला मारायला सुरू केल्या.’
‘मी कायदा मानणारी मुलगी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श आहेत. मी संविधान पाळते. म्हणून तिथे माझ्या तोंडाला कुलूप होतं. म्हणून मी तिथेच उभी राहिले. मला किती मारायचं ते मारू दे.. या ताई माझ्यासोबत होत्या.. ताईंचा मुलगा तिथे आलं त्याने मला महिलांपासून वाचवत बाहेर काढलं.. तेव्हा देखील त्या स्त्रिया माझे केस ओढत होत्या.. मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते की, त्या महिलांनी मला नखं मारली नाहीत किंवा बुक्क्या मारल्या नाहीत. जेणेकरून माझ्या शरीरावर त्याचे व्रण दिसू नयेत.’
‘त्या सगळ्या महिला फक्त मला चापट मारत होत्या. मला सगळीकडे त्या चापट मारत होत्या. ताईंच्या मुलाच्या गाडीवर बसेपर्यंत त्या महिला मला मारत होत्या.’
‘एक तर माझ्या पक्षाची बदनामी केली. म्हणून मी तक्रार करायला आली आहे. माझ्यावर हल्ला असं मी म्हणणार नाही. एकनाथ शिंदे माझे मामा आहेत. माझ्या आजोळामध्ये बोलावून मला हा फार मोठा पुरस्कार दिलेला आहे. आज माझ्यावर शाईफेक केली.. कारण मी बाबासाहेबांच्या प्रतिमेस तिसऱ्यांदा हार घातला म्हणून.’
हे ही वाचा >> Chawadi: 20 वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी झाली असती, फक्त…; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट
‘आता हे षडयंत्र कोणी रचलं.. आणि मी महापुरुषांचा अपमान केला असं म्हटलं जातं.. तर मी काय अपमान केला हे दाखवून द्यावं.’
‘पोलिसात तक्रार नोंदवून मी बाहेर जात असतानाच पोलीस स्टेशनमध्येच माझ्यावर हल्ला झाला. मला राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा आहे की, पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला होतोय. तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या झाडाला, कोणत्या वेशीला टांगली आहे?’
‘मला हे बोलायचं नव्हतं.. पण या सगळ्याला गद्दार लोकं जबाबदार आहेत. माझ्या जीवाला त्यामुळे धोका आहे. यापुढे माझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला गद्दार लोकं जबाबदार राहतील.’
‘ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे म्हणे.. पण ठाणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये हल्ला होतो. मी पुन्हा म्हणेन की, कायदा सुव्यवस्था विकली गेली आहे.’
’21 जून 2022 पासून गद्दार लोकांवर टीका करतेय. तेव्हापासून मला सातत्याने धमक्या येत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं. त्यानंतर मी गुन्हा नोंद केला होता.’ असा संपूर्ण घटनाक्रम यावेळी अयोध्या पौळ यांनी सांगितला.
ज्यानंतर ठाकरे गट देखील आक्रमक झाला असून शिंदे गटावर जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे.
ADVERTISEMENT