Baba Siddique : महिनाभरात मुंबई काँग्रेसला दुसरा धक्का! अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून हा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 baba siddique resign from congress maharashtra minister maharashtra politics

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून हा राजीनामा दिला आहे

प्रशांत गोमाणे

08 Feb 2024 (अपडेटेड: 08 Feb 2024, 11:45 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

point

सिद्दीकींच्या राजीनाम्यामुशे काँग्रेसला दुहेरी धक्का

point

अजित पवार गटात प्रवेश करणार

Baba Siddique Resign From Congress :  काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी  (Baba Siddique) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून हा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता महिन्याभरात काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. (baba siddique resign from congress maharashtra minister maharashtra politics) 
 
 बाबा सिद्दीकी यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये बाबा सिद्दीकी म्हणाले की,  मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात काही गोष्टी न सांगितल्या बऱ्या असतात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

हे वाचलं का?

 गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात (Ajit pawar) प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहे. मात्र बाबा सिद्दीकी खरंच आता अजित पवार गटात प्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp