Bacchu Kadu meet Manoj jarange patil, Maratha Reservation : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाववर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चु कडू यांना मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पाठवले होते. या भेटीत साधारण दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) सरकारसमोर चार मागण्या ठेवल्या होत्या. त्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जरांगे पाटलांच्या सर्व शब्द आणि मागण्या कागदावर लिहून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे आता या जरांगेच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी यावर तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (bacchu kadu meet manoj jarange patil antarwali agitation maratha reservation eknath shinde maratha mumbai protest)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटलांनी याआधीच मुंबईच्या आझाद मैदानात 20 जानेवारीला आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. या आंदोलनाला अवघे 5 दिवस उऱले आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सूरू केले आहेत.त्यानुसार मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची आंदोलन स्थळी भेट घेतली होती. या भेटीत साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली होती.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : “नवरीचा पत्ता नाही, नवरा…”, राणेंनी इच्छुकांचे टोचले कान
या चर्चेदरम्यान जरांगे पाटलांनी चार मागण्या आणि सगेसोयरे शब्दांवर आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यात महत्वाचं म्हणजे नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या रक्त नात्यातील सग्या सोयऱ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या, त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनाही याचा लाभ द्या, सग्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा करण्यासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. यासह 20 तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या, ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी सापडलेल्या लोकांची यादी लावण्यात यावी अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केली आहे. या सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
दरम्यान या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांचे सर्व शब्द आणि मागणी ही कागदावरती लिहून घेतली. त्यात सगे सोयरे या शब्दाची सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटलांनी केलेली व्याख्या यात दुरुस्ती करण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. या चर्चेनंतर बच्चू कडू हे मुंबईला निघाले असून याविषयी तोडगा कसा निघेल याकरिती ते सरकारशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता यावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT