Balasaheb Thorat Daughter Jayashree Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. डॉ. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान जयश्री थोरात यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच नगरच्या राजकारणात ट्विस्ट येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. ( balasaheb thorat daughter jayashree thorat politics entry sangamner assembly youth president maharashtra youth congress)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र युथ काँग्रसने याबाबतच पत्र काढून जयश्री थोरातांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. या पत्रात जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
जयश्री थोरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये सक्रिय आहेत. त्यात आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्यानंतर जयश्री थोरात सक्रिय राजकारणात आल्या आहेत.त्यामुळे थोरातांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे.
डॉ. जयश्री थोरात कोण ?
जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. डॉ. जयश्री थोरात या कॅन्सरतज्ञ आहेत. एमबीबीएसचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ब्लड कॅन्सरच्या विषयावर एमडी शिक्षण पुर्ण केले होते. मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागातही काम केले आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून त्या एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्य करत आहेत. बाळासाहेब थोरात यांची राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.
ADVERTISEMENT