Balwant Wankhede : काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे राजीनामा देणार? राणांचं आव्हान स्वीकारत काय म्हणाले?

मुंबई तक

• 09:59 AM • 09 Dec 2024

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये नवणीत राणा आणि बळवंत वानखेडे यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीमध्ये बळवंत वानखेडे यांनी 5 लाख 26 हजार 271 मंत घेत नवणीत राणा यांना पराभूत केलं होतं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बळवंत वानखेडे राजीनामा देणार?

point

नवनीत राणांचं आव्हान स्वीकारलं

Navneet Rana Vs Balwant Wankhede : माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर निवडणूक लढवावी असं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला आता बळवंत वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.बळवंत वानखडे म्हणाले, "नवनीत राणा यांचं आव्हान मी स्वीकारतोय. मी माझ्या खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, मात्र राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक घेण्याचं लेखी आश्वासन निवडणूक आयोगानं द्यावं. तसंच त्या निवडणुका बॅलेट पेपरवर होतील असं लेखी द्यावं." 

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाकडून स्पष्ट आणि लेखी पत्र मिळेल या अटीवरच आपण आपल्या पदावरून पायउतार होण्यास तयार असल्याचं वानखेडे म्हणाले. नवनीत राणा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, हा गंभीर विषय असून त्यावर लोकशाही प्रक्रियेतून निर्णय व्हायला हवा. नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांच्याबद्दल बोलताना पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे जनतेसमोर बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी, असं म्हटलं होतं. 
 

हे ही वाचा >>India Alliance : उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्यावं, बड्या नेत्याचा राहुल गांधींवर अविश्वास?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये नवणीत राणा आणि बळवंत वानखेडे यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीमध्ये बळवंत वानखेडे यांनी 5 लाख 26 हजार 271 मंत घेत नवणीत राणा यांना पराभूत केलं होतं. या पराभवानंतर नवनीत राणा वारंवार बळवंत वानखेडे, यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना दिसल्या आहेत.


काय प्रकरण आहे?

हे ही वाचा >>शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 11 आमदार होणार मंत्री, दोन दिग्गजांना डच्चू?

नवनीत राणा यांनी वानखेडे यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत खासदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरद्वारे निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणांना उत्तर देत बळवंत वानखेडे यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. आता या प्रकरणी निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  एकूणच या राजकीय वादामुळे अमरावतीकरांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 

    follow whatsapp