Barsu refinery : बारसू रिफायनरीवर अजित पवार स्पष्टच म्हणाले, ‘पर्यावरणाचा ऱ्हास…’

मुंबई तक

28 Apr 2023 (अपडेटेड: 28 Apr 2023, 04:04 PM)

Ajit Pawar reaction on Barsu refinery projets : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणावर आता आपली स्पष्ट भूमिका मांडलीय.

barsu refinery projets ajit pawar reaction

barsu refinery projets ajit pawar reaction

follow google news

Ajit Pawar reaction on Barsu refinery projets : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरीवरून (Barsu refinery)  राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणावर आता आपली स्पष्ट भूमिका मांडलीय. पर्यावरणाचा ऱ्हास, नागरीकांचे जनजीवन,मासेमारी आणि पर्यटन या प्रकल्पाचा परिणाम होणार नसेल तर विश्वासात घेऊन समजावून सांगावे असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच सरकारने संवेदनशिलता दाखवावी, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. (Barsu refinery projets political atmosphere heated opposition leader ajit pawar reaction)

हे वाचलं का?

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्र दिले होते, मात्र ते जनतेच्या सोबत आहेत.आता तिथल्या जनतेचा विरोध आहे म्हणून तेही विरोध करतायत, ही त्यांची भूमिका आहे. पण राष्ट्रवादीची भूमिका विकासकामांच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे,अशावेळी काही प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून दुर गेलेले आपण पाहिले असतीलच, ज्यातून काही लोकांना रोजगार मिळणार होता.आता जर यातून रोजगार मिळणार असेल आणि दुष्परीणाम होणार नसेल, निसर्ग सोदर्याला बाधा येणार नसेल, तिथल्या फळांवर परिणाम होणार नसेल तर सरकारने स्थानिकांचे गैरसमज दुर केले पाहिजेत असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा >> बारसूच्या राड्यावर मुख्यमंत्री म्हणाले.. हे तर सर्वसामान्यांचं सरकार… अन्याय करणार नाही!

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर काय म्हणाले?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यंतरी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. या विधानावरून नेतृत्व बदलाचे अनेर तर्कवितर्क लावण्यात आले होते,यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शरद पवारांनी तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी तसे विधान केले होते. आता ह्याला संधी मिळणार, त्याला संधी मिळणार, आता ह्यांना महत्वाचे पद मिळणार असे आपण सगळे दाखवता, आपण त्याच्यातून वेगळा अर्थ काढू नये, असे मीडियाला त्यांनी आव्हान केले.

हे ही वाचा >> ‘दिल्लीतील सैतान आदेश देतायेत, उद्या हॅन्डग्रेनेडही फेकतील..’,बारसूवरून राऊत आक्रमक

जयंत पाटील भावी मुख्यमंत्री…

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेनंतर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्रीचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे देखील नाव समोर आले आहे. यावर अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील पण आमच्याच पक्षातले आहेत. अमोल कोल्हेच्या दृष्टीतून जयंत पाटील जास्त योग्य आणि उत्तम मुख्यंमंत्री असल्याचे मत आहे. प्रत्येकाला आप आपलं मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे, संविधानाने तो अधिकार तुम्हाला आणि मला प्रत्येकालाच दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp